विशेष समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व सभापती, उपसभापतींची निवड : काँगे्रसच्या वाट्याला आरोग्य समिती

By admin | Published: August 6, 2015 10:08 PM2015-08-06T22:08:39+5:302015-08-06T22:08:39+5:30

नवी मुंबई : महापालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. ८ पैकी ७ समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती झाले असून, आरोग्य समितीचे सभापतीपद काँगे्रसला देण्यात आले आहे. महापौर व स्थायी समितीप्रमाणे विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही युतीला काहीही चमत्कार दाखविता आलेला नाही.

NCP's Vice-President, Vice Presidential Election: Congregational Health Committee | विशेष समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व सभापती, उपसभापतींची निवड : काँगे्रसच्या वाट्याला आरोग्य समिती

विशेष समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व सभापती, उपसभापतींची निवड : काँगे्रसच्या वाट्याला आरोग्य समिती

Next
ी मुंबई : महापालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. ८ पैकी ७ समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती झाले असून, आरोग्य समितीचे सभापतीपद काँगे्रसला देण्यात आले आहे. महापौर व स्थायी समितीप्रमाणे विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही युतीला काहीही चमत्कार दाखविता आलेला नाही.
महापौर, उपमहापौर व स्थायी समिती निवडणुकीनंतर सर्व नगरसेवकांचे विशेष समित्यांच्या सभापती पदाकडे लक्ष लागून राहिले होते. वास्तविक निवडणुकांमुळे सभापतींची निवड करण्यास विलंब झाला. नवीन पदाधिकार्‍यांना ७ ते ८ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी पहिल्या वर्षी सभापती होण्यास अनुत्सुक होते. सकाळी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व समित्यांवर काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व मिळविले. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रकाश मोरे व पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती पदावर अशोक गुरखे यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदावर अपर्णा गवते, आरोग्य समिती सभापतीपदावर काँगे्रसच्या पूनम पाटील, समाजकल्याण व झोपडप˜ी सुधार समितीवर मोनिका पाटील, विधी समितीवर ॲड. भारती पाटील, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापतीपदावर गिरीश म्हात्रे तर उद्यान व शहर सुशोभीकरण समितीवर स्वप्ना गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुका पार पडल्या. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, माजी खासदार संजीव नाईक, सागर नाईक, रमाकांत म्हात्रे, पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अभिनंदन केले.
चौकट
उपसभापती पुढीलप्रमाणे
आरोग्य समिती - गणेश म्हात्रे, महिला बालकल्याण समिती - संगीता बोर्‍हाडे, पाणीपुरवठा - उषा भोईर, झोपडप˜ी सुधार समिती - सुरेशा नरबागे, विधी समिती - विशाल डोळस, क्रीडा व सांस्कृतिक - तनुजा मढवी, विद्यार्थी व युवक कल्याण पूजा मेढकर, उद्यान व शहर सुशोभीकरण उपसभापतीपदावर श्रद्धा गवस यांची निवड केली आहे.

चौकट
सभापतींची गैरसोय
सभापतींची निवड झाल्यानंतर त्यांना दालनामध्ये नेवून कार्यभार दिला जातो. परंतु यावेळी दोन विषय समित्या वाढल्या आहेत. त्यांच्यासाठी कार्यालयांची सोय केली नव्हती. यामुळे सभापतींना दुसर्‍या दालनामध्ये बसवून स्वागत करण्यात आले. यामुळे पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.
फोटो आहे

Web Title: NCP's Vice-President, Vice Presidential Election: Congregational Health Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.