कोळसा घोटाळा ही निव्वळ कॅगची कल्पना नव्हे नायडू : भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:42+5:302015-02-21T00:50:42+5:30
नवी दिल्ली : कोळसा खाणप्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.
Next
न ी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.कोळसा घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपने जोर लावला होता. कोणतेही नुकसान झाले नसल्याचा तत्कालीन अर्थमंत्र्यांनी केलेला दावा चुकीचा होता, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कोणताही घोटाळा घडला नसल्याचा दावा केला होता. देशाचे १.८६ लाख कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २० खाणींसाठी योग्य आणि पारदर्शकरीत्या लिलाव करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या फायद्याचाच आहे. केवळ चार दिवसांमध्ये बोली ६० हजार कोटींच्या वर गेल्या आहेत. खनिजसंपन्न राज्यांना त्याचा अधिकाधिक लाभ होईल. सध्या १९ खाणपट्ट्यांचा लिलाव होत असून यापैकी १४ खाणपट्टे यापूर्वीच ८० हजार कोटी रुपयांना विकले गेले आहेत, अशी माहितीही नायडू यांनी दिली.--------------------१५ लाख कोटी मिळण्याची अपेक्षानव्या लिलाव प्रक्रियेतून १५ लाख कोटी रुपये गोळा होण्याची शक्यता आहे, तथापि अनेक बोली विश्लेषकांच्या अपेक्षेपलीकडे गेल्या आहेत.सर्वाधिक कोळसा ग्राहक असलेल्या देशामध्ये अमेरिकेला मागे टाकत चीननंतर दुसरे स्थान भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यात अपयश आल्यामुळे कोल इंडिया लिमिटेडचा कोळसा क्षेत्रातील एकाधिकार मोडित काढण्यात आला आहे.