एनडीएकडे अनेक छाेटे पक्ष, महाराष्ट्रातील ५; वाढवू शकतात मतांचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 06:39 AM2023-07-19T06:39:17+5:302023-07-19T06:39:52+5:30

२०२४मध्ये वाढवू शकतात आघाडीच्या मतांचा टक्का

NDA has several smaller parties, 5 in Maharashtra; Percentage of votes that can be raised | एनडीएकडे अनेक छाेटे पक्ष, महाराष्ट्रातील ५; वाढवू शकतात मतांचा टक्का

एनडीएकडे अनेक छाेटे पक्ष, महाराष्ट्रातील ५; वाढवू शकतात मतांचा टक्का

googlenewsNext

संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२४मध्ये होणाऱ्या महासंग्राममध्ये २६ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीशी मुकाबला करण्यासाठी एनडीएने ३८ पक्षांची आघाडी करून शक्तिप्रदर्शन केले आहे. यात भाजपने बहुतांश लहान पक्षांना आपल्या बाजूने वळविले आहे. ते भलेही स्वत: जागा जिंकू शकतील किंवा न जिंकू शकतील, परंतु एनडीएच्या मताचा टक्का वाढवू शकतात.

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ला शह देण्यासाठी भाजपच्या नेतृत्वात एनडीएची बैठक झाली. अशी बैठक मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिली बैठक होती. या बैठकीला हजर असलेल्या पक्षांपैकी २४ घटक पक्षांचा लोकसभेत एकही सदस्य नाही. फार तर हे पक्ष प्रादेशिक स्तरावर एनडीएचा मताचा टक्का वाढवू शकतात.

सर्वांत मोठा पक्ष शिवसेना
एनडीएच्या भाजपशिवाय इतर घटक पक्षांमध्ये खासदारांच्या संख्येच्या बाबतीत शिवसेना शिंदे गट १२ खासदारांसह सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी पारस गट आहे.

काका-पुतण्याच्या वादात एनडीए
बिहारमध्ये केंद्रीय मंत्री पशुपती पारस व चिराग पासवान हे लोकजनशक्ती पार्टीचे स्वतंत्र गट आहेत. काका-पुतण्यामधील वाद दूर करण्याची जबाबदारी स्वत: अमित शाह यांनी घेतली आहे. सोमवारी त्यांनी चिराग पासवान यांच्याशी याबाबत चर्चाही केली होती.

शिरोमणी अकाली दल, तेलगू देसम पार्टी व राष्ट्रीय लोकदल हे तिन्ही पक्ष एनडीएच्या बैठकीत सहभागी झाले नाहीत. यामागे जागावाटपाचे कारण सांगितले जात आहे. 
टीडीपी आंध्र प्रदेशबरोबरच तेलंगणामध्येही भाजपबरोबर युतीची चर्चा करीत होती. परंतु भाजप तेलंगणात स्वबळावर लढू इच्छित आहे.
पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल भाजपला लोकसभेच्या केवळ चार जागा देऊ करीत आहे. मात्र, भाजप पंजाबमध्ये पाच ते सहा जागा मागत आहे.
रालोदचे जयंत चौधरी यांनी पश्चिम उत्तर प्रदेशच्या जाटबहुल चार जागा मागितल्या आहेत. यात बागपत, मुजफ्फरनगर, कैरानाचा समावेश आहे. भाजपकडून या जागांबाबत आश्वासन न मिळाल्यामुळे चौधरी एनडीएपासून दूर राहिले.

एनडीए गटात कोण? 

भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी (पारस), लोक जनशक्ति पार्टी (रामविलास पासवान), अपना दल (सोनेलाल), एआयएडीएमके, एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, आयएमकेएमके, आजसू, एमएनएफ, एनपीएफ, आरपीआय, जेजेपी, आईपीएफटी (त्रिपुरा), बीपीपी, पीएमके, एमजीपी, एजीपी, निषाद पार्टी, यूपीपीएल, एआयआरएनसी, टीएमसी (तमिल मनीला काॅंग्रेस), शिरोमणि अकाली दल संयुक्त जनसेना, एनसीपी (अजित पवार), हम, रालोसपा, सुभासपा, बीडीजेएस (केरळ), केरळ काॅंग्रेस (थॉमस), गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट, जनातिपथ्य राष्ट्रीय सभा, यूडीपी, एचएसडीपी, जन सुराज्य पार्टी (विनय कोरे), प्रहार जनशक्ति पार्टी (बच्चू कडू)

महाराष्ट्रातील पाच पक्ष
एनडीएत महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाइं आठवले गट, जनसुराज्य पार्टी व प्रहार जनशक्ती पार्टी सहभागी आहे.

 

 

Web Title: NDA has several smaller parties, 5 in Maharashtra; Percentage of votes that can be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.