लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये ‘एनडीए’ला बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 05:58 AM2023-06-08T05:58:47+5:302023-06-08T05:59:45+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बुद्धिबळाचा पट मांडणे सुरू झाले आहे.
विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बुद्धिबळाचा पट मांडणे सुरू झाले आहे. भाजपने महाआघाडीशी स्पर्धा करण्यासाठी प्रादेशिक पक्षांना आपल्या गोटात ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. बिहारमधील विकासशील इन्सान पार्टीचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश साहनी असू द्या किंवा नितीशकुमार यांची साथ सोडून स्वतःचा पक्ष काढणाऱ्या उपेंद्र कुशवाह यांना भाजप आपल्याजवळ करण्याच्या प्रयत्नात आहे.
एवढेच नाही महाआघाडीतील भागीदार हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे संरक्षक आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यावरही भाजपची नजर आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते त्यामुळे उपेंद्र कुशवाह आणि मुकेश साहनी यांच्याशी समझोता जवळपास झाला आहे. लवकरच दोघांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार. ‘व्हीआयपी’ औपचारिकपणे २५ जुलै रोजी एनडीएचा भाग होईल, असे सांगण्यात येत आहे. पक्षाने आतापर्यंत याबाबतची स्थिती स्पष्ट केलेली नाही.