बंदीविरोधात एनडीटीव्ही सर्वोच्च न्यायालयात
By admin | Published: November 7, 2016 01:04 PM2016-11-07T13:04:13+5:302016-11-07T13:04:13+5:30
केंद्र सरकारने घातलेल्या एक दिवसाच्या बंदीविरोधात NDTVने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Next
>नवी दिल्ली, दि. 7 - केंद्र सरकारने घातलेल्या एक दिवसाच्या बंदीविरोधात NDTVने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र सरकारने घातलेली बंदी बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे एनडीटीव्हीने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान संवेदनशील माहिती प्रसारित केल्याचा आरोप ठेवत केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका समितीने नऊ नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे प्रसारण एका दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
हल्ल्याच्या वेळी एनडीटीव्हीने काही संवेदनशील माहिती प्रसारित केली होती. या माहितीचा उपयोग दहशतवाद्यांचे हँडलर्स करू शकले असते. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एनडीटीव्हीला जानेवारी महिन्यातच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.