नमाजासाठी अजान आवश्यक, भोंगे नाही - अहमद पटेल
By admin | Published: April 18, 2017 01:57 PM2017-04-18T13:57:39+5:302017-04-18T14:06:22+5:30
गायक सोनू निगमने भूमिकेवर ठाम असल्याचे ट्विट केले. त्यावर रिट्विट करत काँग्रेसचे अहमद पटेल यांनी नमाजासाठी अजान आवश्यक आहे, भोंगे नाही, असं मत व्यक्त केले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - अजान आणि भोंग्यांवर आक्षेप नोंदवत वादग्रस्त ट्विट करणारा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने आपण आजही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. "मस्जिद किंवा मंदिरांवर भोंगे लावण्यावर परवानगी मिळू नये, असे सोनूने नव्याने ट्विट केले आहे. त्यामुळे पुन्हा "भोंगे" या विषयावर यावर सोशल मीडियामध्ये लाउड चर्चा सुरू झाली आहे.
सोनू निगमने नव्याने केलेल्या ट्विटवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. "नमाज अदा करण्यासाठी अजानाची गरज आहे. अत्याधुनिक युगात नमाजासाठी भोंग्यांची आवश्यकता नाही", असे परखड मत पटेल यांनी मांडले आहे.
यावर "समजूतदार व्यक्ती अशा प्रकारे मुद्दा समजून घेतात. तुमचा आदर आहे अहमद पटेल जी. अजान किंवा आरतीचा नाही तर हा मुद्दा भोंग्याचा आहे," अशी प्रतिक्रिया सोनूनं दिली आहे.
नेमके काय केले होते सोनूनं ट्विट?
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले.
This is how Sensible people Interpret an issue. Respects Mr Ahmed Patel. It is not about Azaan or Aarti. It"s about Loudspeaker. https://t.co/8aABhYLic2
— Sonu Nigam (@sonunigam) April 18, 2017
Dear everyone. Your stand exposes your own IQ. I stand by my statement that loudspeakers should not be allowed in Mosques & Temples. Period
— Sonu Nigam (@sonunigam) April 18, 2017