लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांची मानसिकता बदलाची गरज
By admin | Published: March 18, 2016 12:15 AM2016-03-18T00:15:15+5:302016-03-18T00:18:18+5:30
दिंडोरी : गावाचा सर्वांगीण विकास करून आदर्श गाव बनविण्यासाठी शासकीय योजना योग्य व प्रामाणिकपणे राबवून भौतिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच हगणदारी मुक्ती, गाव स्वच्छता यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक ग्रामस्थाने आपणच सरपंच आहोत, या भूमिकेतून काम केल्यास आदर्श गाव होणे अवघड नाही, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. मोहाडी (ता. दिंडोरी) येथे कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात आयोजित व्याख्यानात आदर्श गावनिर्मितीत लोकप्रतिनिधींची भूमिका व लोकसहभागाचे महत्त्व या विषयावर बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरणार्या कुटुंबाला वर्षभर ॲक्वाचे शुद्ध पाणी व धान्य मोफत दळून देण्याची व्यवस्था, शंभर टक्के करवसुली, पर्यावरण संतुलित योजनेत व्यक्तिपरत्वे दोन झाडांचे संगोपन, गावातील अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ग्रामस्थांना ग्रामपंचायत आपली वाटावी यासाठी प्रत्येकाचा वाढिदवस साजरा करण्यात येतो. अशा अनेक बाबींमुळे गावाला दोन वेळा राष्ट्रपती पारितोषिक, तर भारतातील अकरा आदर्श ग्रामपंचायतीत स्थान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्र मात मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल, भाऊलाल तांबडे यांची शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल व परिसरातील अकरा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी कादवाचे माजी अध्यक्ष बाजीराव कावळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धनराज महाले, माणिकराव बोरस्ते, ओझर मर्चंट बॅँकेचे अध्यक्ष वसंत गवळी, डॉ. भाऊसाहेब मोरे, बी. पी. गायधनी, वसंत कावळे, अनिल कुंदे, सुनील मातेरे, संपतराव घडवजे, शहाजी सोमवंशी, सुरेश कळमकर, भाऊराव पाटील, राजाराम जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य विलास देशमुख, सूत्रसंचालन संजय डिंगोरे व जगदीश बोराडे, तर आभार गटनेते प्रवीण जाधव यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानसह उत्तम जाधव, प्रदीप जाधव, बापूसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र जाधव, बाबा निकम.
फोटो ओळ : मनोगत व्यक्त करताना भास्करराव पेरे पाटील, बाजीराव कावळे, माणिकराव बोरस्ते, धनराज महाले, भाऊलाल तांबडे, भाऊसाहेब मोरे व इतर.
(फोटो : आयटीपीएचला दिंडोरी १ नावाने सेव्ह आहे.)