जळगाव रेल्वे स्थानकावर होम प्लॅटफार्मची आवश्यकता
By admin | Published: February 17, 2016 12:24 AM2016-02-17T00:24:24+5:302016-02-17T00:24:24+5:30
मागणी : खान्देश रेल्वे प्रवासी मंचचा प्रयत्न
Next
म गणी : खान्देश रेल्वे प्रवासी मंचचा प्रयत्नजळगाव : रेल्वे स्थानकावर प्रवाशी व अपंगांच्या सोयीसाठी होम फलाटाची आवश्यकता आहे. स्थानकावर नवीन फलाट तयार करण्याची मागणी खान्देश प्रवाशी मंचतर्फे रेल्वे प्रशासनाला केली आहे.अपंग, जेष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावरील जीने चढ उतार करण्यात येणार्या अडचणी व स्थानकावर कुलींची कमी संख्या पाहता मोठे सामान ने-आन करण्यासाठी वेळेवर कुली उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना मोठी अडचण होत असते. स्थानकावर प्रवाशांची वर्दळ पाहता रेल्वे स्थानकार होम फलाटाची आवश्यकता आहे. फलाटाचे झाले नियोजनकाही वर्षापूर्वी संघटनेच्या पदाधिकार्यांची तत्कालीन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांशी सकारात्मक चर्चा करण्यात झाली होती. त्यात आरक्षण कार्यालया शेजारील गुडशेडच्या ठिकाणी या फलाटाचे नियोजन करण्यात आले होते. जळगाव यार्डातील गुडशेडचे काम पूर्ण झाल्यावर स्थानकावरील या शेडच्या जागेवर फलाटाचे काम करण्यात येणार होते. मात्र अद्यापही फलाटाच्या कामास सुरुवात झालेली नाही.होम फलाटहोम फलाट जमीन पातळीवर असल्याने प्रवाशांना फलाटावर ये -जा करण्यात अडचण भासत नाही. प्रवाशांची वाहने फलाटापर्यंत पोहोचणे शक्य असल्याने अपंग, अंध, जेष्ठ नागरिक व मोठ मोठे सामना घेऊन प्रवास करणार्या प्रवाशांच्या अडचणी कमी होण्यास मदत होते.भुसावळला ही मागणीजळगाव सह भुसावळ रेल्वे स्थानकावरही प्रवाशांच्या सोयीसाठी होम फलाटांची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेेने नुकतीच रेल्वे प्रशसनाकडे मागणी केली असून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे अध्यक्ष राजेश भराडिया यांनी सांगितले.