पॅनसाठी आधार कार्ड का हवे?
By admin | Published: April 22, 2017 01:26 AM2017-04-22T01:26:35+5:302017-04-22T01:26:35+5:30
पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारवर प्रश्नांचा मारा केला. सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की
नवी दिल्ली : पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारवर प्रश्नांचा मारा केला. सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, बनावट कंपन्यांच्या नावे रक्कम वळती करण्यासाठी बनावट पॅन कार्डचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, सरकारला आढळून आले आहे की, बनावट रेशन कार्ड आणि दुसऱ्या कागदपत्रांच्या आधारे अनेक बनावट पॅन कार्ड मिळविण्यात आली आहेत. त्याचा उपयोग बनावट कंपन्यांना पैसा देण्यासाठी होत होता. एका व्यक्तीकडे अनेक पॅन कार्ड असल्याचे दिसून आले. त्यामुळे पॅन कार्डच्या अर्जासाठी आधार अनिवार्य करण्यात आले.
न्यायालयाने यावर विचारले की, पॅन कार्डसाठी आधार असणे हा उपाय आहे का? न्यायालयाच्या आदेशानंतरही आधारला अनिवार्य का करण्यात आले? या प्रकरणात आता २५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)