संघात स्थान हवे; मग शारीरिक संबंध स्थापित करा!

By admin | Published: October 30, 2014 01:17 AM2014-10-30T01:17:39+5:302014-10-30T01:17:39+5:30

राष्ट्रीय संघात स्थान हवे असेल किंवा मिळविलेले स्थान टिकवायचे असेल, तर टीम मॅनेजमेंट आणि निवडकत्र्याशी शारीरिक संबंध स्थापित करावे लागतात,

Need a place in the team; Then establish physical relations! | संघात स्थान हवे; मग शारीरिक संबंध स्थापित करा!

संघात स्थान हवे; मग शारीरिक संबंध स्थापित करा!

Next
श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ : महिलांची तक्रार
कोलंबो : राष्ट्रीय संघात स्थान हवे असेल किंवा मिळविलेले स्थान टिकवायचे असेल, तर टीम मॅनेजमेंट आणि निवडकत्र्याशी शारीरिक संबंध स्थापित करावे लागतात, अशा प्रकारची खळबळजनक कबुली श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटूंनी दिल्याने देशात खळबळ माजली आहे. चित्रपटांप्रमाणो आता क्रिकेटमधील ‘कास्टिंग काऊच’चा हा प्रकार चव्हाटय़ावर आला. राष्ट्रीय संघात स्थान हवे असेल, तर आमच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करा, अशी मागणी हे निवडकर्ते करीत असल्याची महिला क्रिकेटपटूंनी तक्रार केली. श्रीलंकेच्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी टीम मॅनेजमेंट आणि निवडकत्र्याविरुद्ध आरोप केले. 
राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी किंवा असलेले स्थान टिकविण्यासाठी अधिका:यांपासून निवडकत्र्यार्पयत शरीरिक संबंध ठेवावे लागतात. सर्वाना खूष केल्याशिवाय निवडीचा विचारही होत नाही, असे खेळाडूंनी सांगितले. 
दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मात्र टीम मॅनेजमेंट आणि निवडकत्र्यावर लागलेल्या या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे तडकाफडकी आदेश दिले. लंकेच्या पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ते सनथ जयसूर्या, एसएलसी सचिव निशांत रणतुंगा आणि सहसचिव हेरांता परेरा यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली.
रिपोर्टनुसार चार सदस्यांचे चौकशी पथक प्रकरण हाताळेल. तथ्य पुढे आणण्यासाठी श्रीलंकेच्या महिला खेळाडू आणि टीम मॅनेजमेंट चर्चा करतील. महिलासंघाचे व्यवस्थापक आणि निवडकर्ते यांना शुक्रवारच्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.  (वृत्तसंस्था)

 

Web Title: Need a place in the team; Then establish physical relations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.