आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची गरज - मोहन भागवत

By Admin | Published: September 21, 2015 11:43 AM2015-09-21T11:43:13+5:302015-09-21T12:07:53+5:30

पटेल समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेलने असतानाच आरक्षण धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

Need to reconsider the reservation - Mohan Bhagwat | आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची गरज - मोहन भागवत

आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची गरज - मोहन भागवत

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - पटेल समुदायाला आरक्षण देण्याची मागणी करत हार्दिक पटेलने संपूर्ण गुजरात ढवळून काढला असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांनी हा विचार मांडला आहे.
 
एक बिगरराजकीय समिती तयार करून आरक्षणाच्या मुद्याचा आढावा घेण्याची गरज आहे. कोणाला किती व कधीपर्यंत आरक्षण दिले जावे याचा विचार या समितीतील तज्ञ करतील. मात्र या समितीत राजकीय नेत्यांऐवजी सामाजिक सेवा करणा-या व्यक्तींना प्राधान्य दिले जावे, असे मतही त्यांनी मांडले. राजकीय फायद्यासाठी आरक्षणाचा वापर करण्यात येत असल्याने त्याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीत आपल्या हितासाठी काही समूह एकत्र येतात, पण आपल्या महत्वकांक्षेपायी अन्य वर्गांच्या हितांच नुकसान होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले.
सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या वर्गाला आरक्षण दिले पाहिजे असे संविधानात नमूद केले आहे. मात्र आज आरक्षणाचा राजकारणासाठी वापर होतो. जर संविधानानुसार सर्व घडले असते तर आज हे प्रश्न निर्माणच झाले नसते असेही भागवत म्हणाले. या मुद्यावर सतत आंदोलनं होू नयेत यासाठी सरकारनेही संवेदनशील भूमिका ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. 

 

Web Title: Need to reconsider the reservation - Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.