सुपेकर, रायतेंच्या निलंबनासाठी सीआयडी अहवाल आवश्यक : दीक्षित
By Admin | Published: November 15, 2015 11:13 PM2015-11-15T23:13:51+5:302015-11-15T23:13:51+5:30
जळगाव : जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सीआयडी चौकशीत व्यत्यय निर्माण केल्यास त्यांच्या निलंबनाचा विचार केला जाईल, मात्र त्यासाठी सीआयडीचा अहवाल आवश्यक असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते़
ज गाव : जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सीआयडी चौकशीत व्यत्यय निर्माण केल्यास त्यांच्या निलंबनाचा विचार केला जाईल, मात्र त्यासाठी सीआयडीचा अहवाल आवश्यक असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते़पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्त्येच्या तपासाच्या प्रगतीबाबत माहिती देताना दीक्षित म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून, ती स्वतंत्र व सक्षम यंत्रणा आहे़ यावर पत्रकारांनी संशयित पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते हे जळगावमध्येच कार्यरत असल्याने सीआयडी तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता सीआयडी अधिकार्यांवर दबाव नसून तसे असल्यास ते त्यांचा अहवाल मला पाठवतील़ त्यांनी अशा स्वरूपाचा अहवाल पाठविल्यास या दोन्ही अधिकार्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले़ त्यामुळे या अधिकार्यांची पोलीस महासंचालक पाठराखण करीत असल्याची शंका उपस्थित केली जाते आहे़पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन ऑक्टोबरमध्ये आत्महत्त्या केली़ तत्पूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सुपेकर, रायते, चौधरी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे़ यावेळी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन, पोलीस उपायुक्त विजय पाटील, पकंज डहाणे, अविनाश बारगळ आदिंसह अधिकारी उपस्थित होते़--इन्फो--सीआयडीचे तिघांना समन्ससादरे आत्महत्त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीने जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे, संशयित सागर चौधरीचे वाळू व्यवसायातील भागीदार रवींद्र चौधरी व राजेश मिश्रा या तिघांना समन्स काढले असून, त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे़ या तिघांचीही नाशिकच्या कार्यालयात वेगवेगळी चौकशी केली जाणार असून, रवींद्र चौधरी यांची सोमवारी (दि़१६) चौकशी केली जाणार असून, या चौकशीसाठी प्रश्नावलीदेखील तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे़नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालयातील आढावा बैठकीत बोलताना राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित़ समवेत पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, पोलीस उपायुक्त विजय पाटील़