मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:50 PM2018-03-19T23:50:59+5:302018-03-19T23:50:59+5:30

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.

Need a separate company for Mumbai local, World Bank information | मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना

मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना

Next

नवी दिल्ली/मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.
जागतिक बँकेचे भारताचे संचालक जुनैद अहमद यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले की, मुंबईला अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ आणि भारताच्या पहिल्या उपनगरी रेल्वे कंपनीची गरज आहे. सध्या उपनगरीय रेल्वेसाठी प्रकल्पनिहाय दृष्टिकोन स्वीकारून व्यवस्थापन केले जाते. त्याऐवजी एक मजबूत सार्वजनिक संस्था निर्माण करण्याची गरज आहे.
अहमद यांनी सांगितले की, प्रस्तावित कंपनी सरकारी मालकीची असू शकते, अशा कंपनीचे अनेक फायदे होतील. ही कंपनी अत्यंत कार्यक्षम असेल. बाजारातील संकेतांना ती चटकन प्रतिसाद देईल. ती बाजारातून भांडवल उभी करू शकेल आणि आपल्या कामगारांनाही समभाग देईल, अशी कंपनी स्थापन न झाल्यास बदलत्या तंत्रज्ञानाला प्रतिसाद देणे कठीण होऊन जाईल. हे तंत्रज्ञान संस्थेला हुलकावणी देत राहील. अहमद यांनी सांगितले की, अन्य सार्वजनिक आणि प्रवासी सेवांबाबतही हाच दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. केवळ प्रकल्प उभे करण्याऐवजी मजबूत संस्था उभ्या करण्यासाठी हालचाली करणे आवश्यक आहे. चांगल्या गुंतवणूक संधी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेकडून बँक विनियोजनक्षम संस्था निर्माण करणे हे आगामी काळातील आव्हान राहणार आहे. कार्यक्षम संस्था निर्माण करणे येत्या काळात महत्त्वाचे ठरेल.
६0 लाख प्रवासी
मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ६ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. शहरात एकूण चार मार्गांवरून गाड्या धावतात. या सेवेचे व्यवस्थापन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत केले जाते. रेल्वेला मिळणाºया एकूण महसुलात उपनगरीय रेल्वेच्या महसुलाचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक २00२ पासून मुंबईतील रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आहे. दोन प्रकल्पांमार्फत प्रशस्त आणि अत्यंत कमी ऊर्जेवर चालणाºया दोन रेल्वे रेक्स प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसाह्य केले आहे.

लोकलमुळे ४ हजार कोटींचा तोटा
मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेमुळे (लोकल) गेल्या तीन वर्षांत रेल्वे विभागास ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री राएन गोहेन यांनी लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, २0१४-१७ या काळात उपनगरीय सेवेमुळे रेल्वेला ४,२७९ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

Web Title: Need a separate company for Mumbai local, World Bank information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.