दहशतवादाच्या दानवाला रोखण्याची गरज - मोदी

By admin | Published: July 5, 2017 02:24 AM2017-07-05T02:24:09+5:302017-07-05T08:40:08+5:30

जागतिक शांततेसाठी धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाला रोखण्याचा इरादा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

Need to stop terrorism fund - Modi | दहशतवादाच्या दानवाला रोखण्याची गरज - मोदी

दहशतवादाच्या दानवाला रोखण्याची गरज - मोदी

Next
ऑनलाइन लोकमत
तेल अव्हिव, दि. 5 - जागतिक शांततेसाठी धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाला रोखण्याचा इरादा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशांमध्ये सहकार्याला प्राथमिकता असल्याचेही सांगितले. यावेळी मोदींनी दहशतवादाची तुलना दावनाशी केली. 
इस्राइलच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी  मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाची तुलना दानवाशी केली. तसेच त्याला रोखण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर सभ्य समाजात दहशतवादाला कोणतेही स्थान नसल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले.  इस्राइलमध्ये करण्यात आलेले भव्य स्वागत आणि मानसन्मानाबाबत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानले.  
 
प्रसारमाध्यमांना दिलेल्या वक्तव्यात नेतान्याहू म्हणाले, "आम्ही एकत्र येऊन आपल्या नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठे कार्य करू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे,  भारत आणि इस्राइल एकसारख्याच आव्हानांचा सामना करत आहेत.  दहशतवादाचे उच्चाटन करणे त्यातील प्रमुख आव्हान आहे. त्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे."
यावेळी मोदींनीही दहशतवादाच्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले,  आपण एकमताने दहशतवादाच्या  अपप्रवृत्तीचा सामना केला पाहिजे.  तसेच आमची शांती, स्थैर्य आणि समृद्धीला मिळालेल्या धमक्यांना प्रतृत्तर देण्यासाठी मजबूत सुरक्षेची गरज आहे."  

Web Title: Need to stop terrorism fund - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.