अवघ्या आफ्रिकेला लागते, तितकी वीज तुमचा एसी फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 09:54 AM2023-10-25T09:54:35+5:302023-10-25T09:55:21+5:30

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

needs enough electricity to blow your ac | अवघ्या आफ्रिकेला लागते, तितकी वीज तुमचा एसी फुंकणार

अवघ्या आफ्रिकेला लागते, तितकी वीज तुमचा एसी फुंकणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमानवाढ तसेच वाढती गरज लक्षात घेता देशात घरगुती वातानुकूलित यंत्राचा (एसी) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०५० पर्यंत देशात एसीसाठी लागणारी विजेची मागणी नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर ही गरज आजच्या संपूर्ण आफ्रिकेतील एकूण विजेच्या वापरापेक्षा जास्त असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) मंगळवारी सांगितले.

आयईएने सांगितले की, गेल्या पाच दशकांमध्ये भारताने ७००हून अधिक उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत, ज्यात १७,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे भारतातील एसीची मागणी वाढत्या उत्पन्नासह सातत्याने वाढत आहे. २०१० पासून तिप्पट वाढून प्रति १०० कुटुंबांमागे २४ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. घरगुती एसीची मागणी २०५० पर्यंत नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे, असे म्हटले आहे.

२०५० पर्यंत दरडोई उत्पन्न तिप्पट होणार

भारतातील प्रदूषणरहित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक २०२२ मध्ये सुमारे ६० अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत दुप्पट होईल. निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या दशकाच्या अखेरीस गुंतवणूक जवळजवळ तिप्पट होण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येची वाढ मंदावली असली, तरी २०५० पर्यंत शहरी लोकसंख्या ७४ टक्क्यांनी आणि दरडोई उत्पन्न तिप्पट वाढेल.

भारताची ऊर्जेची गरज

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

 

Web Title: needs enough electricity to blow your ac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज