निळवंडेचे कालवे मातीचे होऊ देणार नाही
By admin | Published: September 3, 2016 01:50 AM2016-09-03T01:50:19+5:302016-09-03T01:50:19+5:30
Next
>शिवतारे यांचे घूमजाव : जमीन बचाव संघर्ष समितीचा निर्धारअकोले (अहमदनगर) : लाभक्षेत्रात तीन पिढ्या पाण्याची वाट पाहणार्या शेतकर्यांना लवकरात लवकर पाणी देण्यासाठीचा बंदिस्त पाईप कालव्यांचा प्रस्ताव तयार आहे, असे निळवंडे धरणावर गुरुवारी सायंकाळी जाहीर करणार्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी घूमजाव करत प्रस्तावित माती कालव्यांचा सरकारचा आग्रह कायम ठेवल्याने निळवंडे सुपीक जमीन बचाव संघर्ष समितीने निषेध नोंदविला़ रक्तरंजित क्रांती झाली तरी चालेल पण अकोले तालुक्यात मातीचे कालवे होऊ देणार नाही, असा निर्धार मंत्र्यांना बोलून दाखवत निदर्शने केली. धरणाच्या भिंतीवरच प्रकल्पबाधित शेतकर्यांशी संवाद साधला तेव्हा बंदिस्त पाईप कालवे करण्याचा मानस व्यक्त करणार्या मंत्री शिवतारे यांनी बंदिस्त पाईप कालवे करण्यामागे अडचणी असल्याचे शुक्रवारी सकाळी संगमनेर येथे नमूद केले. कालव्यांसाठी जवळपास एक हजार ७०० एकर जमीन अधिग्रहीत करुन शेतकर्यांना मोबदला दिला आहे. अकोले तालुका सोडता लाभक्षेत्रात कालव्यांची कामे पूर्ण होत आली आहेत. बंदिस्त पाईप कालव्यांचा खर्च अधिक आहे, या बाबी मंत्री शिवतारे यांनी मांडताच अकोले तालुक्यातील सुपीक जमीन बचाव संघर्ष समितीने निषेध नोंदविला. निळवंडे सुपीक जमीन बचाव संघर्ष समितीतर्फे वितरीकांसह बंदिस्त पाईप कालव्यांची मागणी करत रक्त सांडावे लागले तरी चालेल, पण माती कालव्यांसाठी अकोले तालुक्यातील कणभर जमीन देणार नाही, असा निर्धार डॉ. अजित नवले, राष्ट्र सेवा दलाचे साथी विनय सावंत, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद देशमुख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़