नीरव मोदीनं पीएनबी अधिका-यांना लाचेच्या स्वरूपात दिले होते सोने आणि हि-याचे दागिने- सीबीआय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 06:35 PM2018-03-04T18:35:05+5:302018-03-04T18:35:05+5:30

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 12 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीसंदर्भात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

Neerav Modi had given PNB officials as bribe to gold and jewelery- CBI | नीरव मोदीनं पीएनबी अधिका-यांना लाचेच्या स्वरूपात दिले होते सोने आणि हि-याचे दागिने- सीबीआय

नीरव मोदीनं पीएनबी अधिका-यांना लाचेच्या स्वरूपात दिले होते सोने आणि हि-याचे दागिने- सीबीआय

Next

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 12 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीसंदर्भात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. नीरव मोदी स्वतःचं काम करवून घेण्यासाठी पीएनबी बँकेच्या अधिका-यांना लाचेच्या स्वरूपात सोने आणि हि-याचे दागिने देत असल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालं आहे.

सीबीआयनं शनिवारी कोर्टात सांगितलं की, पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेतील फॉरेक्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेले अधिकारी यशवंत जोशी हे नीरव मोदी याच्याकडून सोने आणि हि-याचे दागिने लाचेच्या स्वरूपात घेते होते. तपासादरम्यान यशवंत जोशींनी हे स्वतः कबूल केल्याचंही सीबीआयनं न्यायालयात स्पष्ट केलं आहे. जोशी यांनी नीरव मोदी याच्याकडून 60 ग्रॅमची दोन सोन्याची नाणी आणि सोने व हि-याचे कानातलेही घेतले होते.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँक फसवणुकीच्या या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 14 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तर अटकेच्या भीतीनं नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी आधीच भारतातून पलायन केलं आहे. परंतु ते दोघेही निर्दोष असल्याचा दावा करत आहेत. नीरव मोदीने सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासाठी नकार दिला आहे. सीबीआयने नीरव मोदीला ई-मेल लिहून तपासात सहभागी होण्यास सांगितलं होतं. यावर नीरव मोदीने स्पष्टपणे नकार दिला. मी परदेशात माझ्या व्यवसायानिमित्त व्यस्त आहे, असं कारण नीरव मोदीने दिलं आहे. यानंतर सीबीआयने पुन्हा एकदा नीरव मोदीला पत्र लिहित पुढील आठवड्यात करण्यात येणा-या चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला.

सीबीआयने नीरव मोदीला 12,636 कोटी रुपयांच्या घोटाळा तपासात सहभागी होण्यास सांगितलं होतं. नीरव मोदीने दाखवलेल्या उर्मटपणानंतर सीबीआयने पुन्हा एकदा कठोर शब्दांत पत्र पाठवत कारणं चालणार नाहीत असं म्हटलं आहे. कोणत्याही आरोपीला तपासात सहभागी करून घेण्यासाठी कळवणं गरजेचं असतं. सीबीआयने नीरव मोदीला ज्या देशात असशील तेथील भारतीय दूतावासाला संपर्क साधण्यास सांगितलं होतं. त्याची भारतात येण्याची व्यवस्था केली जाईल. याआधी नीरव मोदीने आपल्या वकिलाच्या माध्यमातून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल की नाही अशी शंका व्यक्त केली होती. जोपर्यंत निष्पक्ष चौकशीचं आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आपण भारतात येण्याचा निर्णय घेऊ शकत नाही, असं नीरव मोदीने म्हटलं होतं.

दुसरीकडे सीबीआयने पीएनबी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे मुख्य परीक्षक (चिफ ऑडिटर) एम के शर्मा यांना अटक केली. बँकेच्या कर्मचा-याची ही पहिली अटक असल्याचं सांगितलं जात आहे. बँकेच्या लेखा परीक्षणाचे ते प्रमुख होते. इतका मोठा घोटाळा लेखा परीक्षकांच्या लक्षात यायलाच हवा होता. तो त्यांच्या लक्षात आला नाही की, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हे सीबीआय तपासून पाहत आहे. घोटाळ्यात त्यांची काही भूमिका नव्हती ना, हेदेखील तपासून पाहिलं जात आहे. 

Web Title: Neerav Modi had given PNB officials as bribe to gold and jewelery- CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.