नीरव मोदीने फिरविला २०० शेल कंपन्यांतून पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:58 AM2018-02-19T01:58:25+5:302018-02-19T03:19:43+5:30

पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील प्रमुख आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याचे कुटुंबिय, धंद्यातील भागिदार मेहुल चोकसी व इतरांशी

Neerav Modi revolves around 200 shell companies | नीरव मोदीने फिरविला २०० शेल कंपन्यांतून पैसा

नीरव मोदीने फिरविला २०० शेल कंपन्यांतून पैसा

Next

नवी दिल्ली/मुंबई: पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील प्रमुख आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याचे कुटुंबिय, धंद्यातील भागिदार मेहुल चोकसी व इतरांशी संबंधित किमान २०० शेल कंपन्या व बेनमी मालमत्ता आता तपासी यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.
मोदी, चोकसी व त्यांच्या कंपन्यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी लागोपाठ चौथ्या दिवशी धाडसत्र सुरु ठेवले व त्यात देशातील अनेक ठिकाणच्या दागिन्यांच्या शोरूम व कारखान्यांवर छापे टाकण्यात आल्या. सीबीआयने पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडीरोड शाखेवरही छापे मारले.
‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितले की, नीरव मोदी व त्याच्या कंपन्याशी संबंधित ज्या २९ मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने हंगामी जप्ती आणली आहे त्या मालमत्तांची आम्ही ‘मनी लॉड्रिंग’ कायद्यान्वये आम्ही छाननी करीत असून त्या मालमत्तांवर आम्हीही लवकरच टांच आणू.
पीएनबी घोटाळ््यातील पैसा फिरविण्यासाठी ज्यांचा वापर केला गेला अशा सुमारे २०० बनावट व शेल कंपन्यांचाही ‘ईडी’ व प्राप्तिकर विभाग मागोवा घेत आहे. गुन्ह्यातून मिळविलेला पैसा वापरून जमीनमुमला, सोने व हिरे आणि रत्ने या स्वरूपात बेनामी मालमत्ता करण्यास या कंपन्यांचा वापर केला गेला, असा प्राथमिक अंदाज आहे. याचा तपास करण्यासाठी ‘ईडी’ व प्राप्तिकर विभाग या दोघांनीही विशेष पथके स्थापन केली आहेत. ‘ईडी’ने आत्तापर्यंत हिरे, दागिने व अन्य मौल्यवान रत्नांच्या स्वरूपात ५,६७४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टांच आणली आहे. दुसरीकडे प्रप्तिकर विभागाने नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित २९ मालमत्तांवर जप्ती आणली असून १०५ बँक खाती गोठविली आहेत.

सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करा - असोचेम
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरील नियंत्रणे हटवून त्यांना खाजगी क्षेत्रातील बँकेप्रमाणे काम करु द्यावे, असे असोचेम या उद्योगक्षेत्रातील संघटनेने म्हटले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे हे बँकांसाठी शाप व वरदान असे दोन्ही ठरत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील आपल्या भांडवलाचे प्रमाण सरकारने ५० टक्क्यांपेक्षा कमी केले तर त्या बँकांना अधिक स्वायत्तता मिळेल. तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाला अधिक विश्वासार्हता व जबाबदारीने काम करता येईल असे असोचेमचे सेक्रेटरी जनरल डी. एस. रावत यांनी एका पत्रकात म्हटले आहे.

घोटाळ्यात अन्य बँकांचाही सहभाग
कोलकाता : पीएनबी घोटाळ्यात अन्य बँकांचाही सहभाग असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आणखी पाच अधिकाºयांची चौकशी
पीएनबी घोटाळ्यात बॅँकेच्या आणखी पाच अधिकाºयांची सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. चौकशीत असलेल्या अधिकाºयांची संख्या आता ११ झाली आहे. सीबीआय गीतांजली समूहाच्या १८ उपकंपन्यांचे व्यवहारही तपासणार आहे.

पंतप्रधान मोदी दोन तासाच्या परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हावे याचे सल्ले विद्यार्थ्यांना देतात, पण २२ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ््याविषयी बोलायला त्यांच्याकडे दोन मिनिटांचाही वेळ नाही. जेटली तर लपूनच बसले आहेत. तुम्हीच गुन्हेगार असल्याप्रमाणे वागणे बंद करा आणि तोंड उघडा!
-राहुल गांधी, अध्यक्ष,
काँग्रेस (टिष्ट्वटरवर)

पंजाब नॅशनल बँकेकडून निरव मोदीच्या कंपन्यांना दिली गेलेली ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग्ज’ (एलओयू) जेथे वटविली गेली त्या इतर भारतीय बँकांच्या हाँगकाँग येथील शाखांमधील अधिकारीही या तपासाच्या घेºयात आल्या आहेत. सलन सात वर्षे सुरु असलेल्या या घोटाळ््यात अलाहाबाद बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, युको बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचेही अधिकारीही गुंतलेले असावेत असे तपासी यंत्रणांना वाटते. यापैकी स्टेट बँकेने २१२ दशलक्ष डॉलर, युनियन बँकेने ३०० दशलक्ष डॉलर, उको बँकेने ४११.८२ दसलक्ष डॉलर तर अलाहाबाद बँकेने दोन हजार कोटी रुपये एवढ्या आपल्याकडील रकमा गोत्यात येण्याचा अंदाज केला आहे.

Web Title: Neerav Modi revolves around 200 shell companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.