नीरव मोदीचा लंडनमध्ये धंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:39 AM2019-03-10T06:39:40+5:302019-03-10T06:40:04+5:30
पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) १३,५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये वास्तव्यास
लंडन : पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) १३,५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी हा लंडनमध्ये राहत असून, तेथील ‘द टेलिग्राफ’ दैनिकाच्या प्रतिनिधीने त्याला गाठले; पण त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळून तो कारमधून निघून गेला. त्याने लंडनमध्ये हिऱ्यांचा व्यवसाय थाटला आहे. मोदीच्या प्रत्यर्पणाची विनंती भारताने जुलै २०१८मध्ये ब्रिटनला केली होती. ही विनंती तेथील गृह मंत्रालयाने वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात पाठविली आहे. त्यामुळे कोर्टच प्रत्यर्पणाचा निर्णय घेईल. मोदीला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत बोलण्याचे तेथील गृहमंत्रालयाने नाकारले. नीरव मोदी लंडनच्या वेस्ट एंड भागात आलिशान फ्लॅटमध्ये राहतो. त्याची किंमत ८ दशलक्ष पाऊंड आहे. ब्रिटिश सरकारने त्याला व्यवसायासाठी राष्ट्रीय विमा क्रमांकही दिला आहे. तो तेथे हिºयाचे दागिने व घड्याळे विक्रीचा व्यवसाय करतो. मोदीने घातलेल्या जाकीटची किंमत किमान १० हजार पाऊंड आहे.