कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:46 PM2021-09-26T12:46:53+5:302021-09-26T12:49:06+5:30
Corona Vaccination: देशात आतापर्यंत 85 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी दुसऱ्या डोसचा आकडा 22.50 कोटींपेक्षा जास्त आहे.
नवी दिल्ली: देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान राबवले जात आहे.लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित केले जात आहे. पण, यात एक निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितनुसार, लसीकरण मोहिमेअंतर्गत शनिवारी कोरोना लसीचे 62 लाख डोस देण्यात आले आहेत. यानंतर, देशात दिलेल्या एकूण डोसची संख्या 85 कोटी ओलांडली आहे. पण, देशातील 6.12 कोटी लोकांनी आतापर्यंत दुसरा डोस घेतला नसल्याचं समोर आलं आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! तिकीट बुकिंग झालं सोपं, रेल्वेनं सुरू केली 'ही' नवीन सुविधा
मिळालेल्या माहितीनुसार, 6.12 कोटी लस न घेतलेल्या नागरिकांपैकी 10 टक्के लोकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. या लोकांना 42 दिवसांच्या आत दुसरा डोस घ्यायचा होता. पण, त्यांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात लसीकरणाअंतर्गत 63,04,33,142 नागरिकांना पहिला आणि 22,50,45,137 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 28 कोटी लोकांना दुसरा डोस मिळायला हवा होता. पण, लोकांच्या निष्काळजीपणामुळे हा आकडा खुप मागे आहे.
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, अनेक सैनिक ठार
मीडिया रिपोर्टनुसार, छत्तीसगडमधील 36.70 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. झारखंडमध्ये हा आकडा 22.29 लाख आहे. उत्तर प्रदेशात 98.56 लाख आहे. तर राजस्थानमध्ये ते 66.78 लाख आहे. बिहारमध्ये असे 41.13 लाख लोक आहेत. मध्य प्रदेशात हा आकडा 51.82 लाख आहे. तसेच, महाराष्ट्रात 41.75 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.