‘राफेल विमान खरेदीविषयी वाटाघाटी सुरू’
By admin | Published: May 17, 2015 01:41 AM2015-05-17T01:41:57+5:302015-05-17T01:41:57+5:30
फ्रेंच सरकारशी राफेल विमान खरेदीबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. चर्चेसाठी एअर मार्शल सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समितीही नेमली आहे,
पणजी : फ्रेंच सरकारशी राफेल विमान खरेदीबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. चर्चेसाठी एअर मार्शल सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समितीही नेमली आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.
राफेल खरेदीविषयी वाटाघाटींसाठी फ्रेंच सरकारने नेमलेली समिती दिल्लीत दाखल झाली आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले. भारतीय नौदल व लष्कराची सुमारे अडीचशे विमाने तीस वर्षांपेक्षाही जुनी झाली आहेत. सगळी जुनी हेलिकॉप्टर्स बदलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात सहा सब-मरिन्स तयार केले जातील, असे त्यांनी सांगितले.
भारताची शस्त्र क्षमता वाढविली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पना संरक्षण खात्याने स्वीकारली आहे. त्याचा लाभ संरक्षण दलास झाला आहे. ४२ विमाने भारतात तयार केली जातील. पूर्वी सारे व्यवहार ठप्प झाले होते. १ लाख ६० हजार कोटींची भांडवली गुंतवणूक रखडली होती. आम्ही आता निर्यातीवरही लक्ष केंद्रित करीत आहोत, असे पर्रीकर म्हणाले.
च्१५ वर्षांत संरक्षण खाते एकही विमान खरेदी करू शकले नव्हते, असा दावाही पर्रीकर यांनी केला.
च्लोकपाल व मुख्य दक्षता आयोग नियुक्तीविषयी केंद्र सरकार गंभीर आहे. मात्र, त्याबाबतचे काही विषय हे न्यायालयात आहेत.
च्मुख्य माहिती आयुक्त नियुक्तीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.