नेहरूंनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी केला नव्हता कोणताही करार
By admin | Published: July 4, 2017 03:13 PM2017-07-04T15:13:21+5:302017-07-04T15:13:21+5:30
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता, याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत चीनसोबत सिक्कीम सीमेसंदर्भातील कोणत्याही संधीचं समर्थन केलं नव्हतं.
हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, 1959 सालात लिहिलेल्या एका पत्रानं याचा खुलासा झाला आहे. त्यावेळी नेहरूंनी चीनसोबत सिक्कीम सीमेबाबतच्या संधी करारावर स्वाक्षरी केली नव्हती. याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे चीनच्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे. चीनच्या मते, सिक्कीम सीमेवरून भारत आणि भूतानसोबत आमची संधी झाली होती. मात्र नेहरूंनी लिहिलेल्या या पत्राचा या दाव्यात कधीही उल्लेख केलेला नव्हता.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनसोबत तिबेट आणि सिक्कीम सीमेसंदर्भात 1890मध्ये कोणतीही संधी केली नव्हती, ही बाब नेहरूंच्या पत्रामुळे समोर आली आहे. चीन, भूतान आणि भारताच्या डोंगराळ भागातल्या सीमेच्या वादामुळे भारत आणि चीनमधील मतभेद टोकाला गेले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जिंग शुआंग यांनी 22 मार्च, 1959 साली लिहिलेल्या या पत्राचा हवाला दिला होता.
(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)
भारतीय सीमेवर वाढीव जवान तैनात करणे याचा अर्थ युद्धाची तयारी करणे असा होत नाही. भारतीय लष्कर तिथे स्वतःच्या सीमेचं संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीत असेल. सिक्कीम सीमेवर सध्या उद्भवलेला तणाव हा 1962च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेष म्हणजे भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे आणि चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे. खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.