नेहरुंना जरा जास्तच महत्त्व दिलं - केंद्रीय मंत्री महेश शर्मा
By Admin | Published: September 29, 2015 12:49 PM2015-09-29T12:49:40+5:302015-09-29T12:50:17+5:30
पंडित जवाहरलाल नेहरुंना त्यांच्या कामासाठी अपेक्षेपेक्षा जास्त श्रेय दिले गेले असे मत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - पंडित जवाहरलाल नेहरुंना त्यांच्या कामासाठी अपेक्षेपेक्षा जास्त श्रेय दिले गेले असे मत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केले आहे. आता अन्य स्वातंत्र्यसैनिकांनाही श्रेय देण्याची गरज आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
महिलांनी रात्री घराबाहेर पडू नये असे विधान केल्याने अडचणीत आलेले केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी आता एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी भाष्य केले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत नेहरुंसोबत अन्य स्वातंत्र्य सैनिकांचेही मोलाचे योगदान होते. पण नेहरुंना जरा जास्तच महत्त्व दिले गेले. सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही मोलाची भूमिका निभावली होती. मग या सर्वांना तेवढे महत्त्व का नाही, आता आम्ही या संदर्भात जनतेच्या प्रतिक्रिया मागवणार आहोत असे महेश शर्मांनी सांगितले.