नेहरूंची नेताजींच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत
By admin | Published: April 10, 2015 11:47 AM2015-04-10T11:47:01+5:302015-04-10T11:47:29+5:30
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्ब्ल २० वर्षे पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्ब्ल २० वर्षे पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. १९४८ ते १९६८ या काळात बोस कुटुंबियांवर पाळत ठेवण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रीय संग्रहालयात असलेल्या गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांतून समोर आली आहे. या २० वर्षांच्या कालावधीत नेहरू १६ वर्षे देशाचे पंतप्रधान होते आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी थेट त्यांच्याकडे अहवाल सादर करत असत.
ब्रिटीशांच्या काळापासून चालत आलेल्या आयबीने २० वर्ष बोस यांच्या कोलकात्यातील वुडबन पार्क आणि ३८/२ इलगिन रस्त्यावरील बोस यांच्या घरांवर नजर ठेवली होती. बोस यांच्या कुटुंबियांनी लिहीलेली अथवा त्यांना आलेली पत्र तपासण्यापासून ते त्यांच्या देशांतर्गत वा परदेशातील प्रवासावरही बारकाईने पाळत ठेवण्यात येत होती. प्रामुख्याने बोस यांचे चुलत बंधू शिशिर बोस व अमेयनाथ बोस यांच्यावर पाळत ठेवम्यात येत होती. बोस यांचे कुटुंबिय कोणाची भेट घेतात, त्यांच्याशी काय चर्चा करताते हे जाणून घेण्याचा आयबीचा प्रयत्न होता, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र या पाळतीमागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.