नेपाळमधून राजदूतांना परत बोलावले
By admin | Published: September 22, 2015 10:36 PM2015-09-22T22:36:35+5:302015-09-22T22:36:35+5:30
नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी
नवी दिल्ली : नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी भारताने नेपाळमधील राजदूत रंजित राय यांना परत बोलावले आहे.
नवीन राज्यघटना लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. या परिस्थितीची प्राथमिक माहिती भारताचे काठमांडूतील राजदूत रंजित राय यांनी केंद्र सरकारला दिली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेपाळ सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून भयमुक्त वातावरणातच वादग्रस्त मुद्यांवर चर्चा होऊ शकते, असे मत भारताने व्यक्त केले आहे.
भारताच्या सीमेलगत नेपाळमध्ये तराई भागात हिंसाचार वाढला असून या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भारताने नेपाळ सरकारला केले आहे. तराईच्या अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर नियंत्रणासाठी नेपाळचे सैन्य बळाचा वापर करीत आहेत. तराई भागात गत ३९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, नेपाळ सरकार आमच्या भावनांची कदर करीत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)