नेपाळ, भूतान सीमा; हजारो स्तंभ गायब
By admin | Published: July 7, 2014 04:41 AM2014-07-07T04:41:18+5:302014-07-07T04:41:18+5:30
भारत-नेपाळ सीमेवरील २७०० हून अधिक सीमा स्तंभ एकतर गायब झाले आहेत किंवा मोडकळीस आले आहेत.
नवी दिल्ली : भारत-नेपाळ सीमेवरील २७०० हून अधिक सीमा स्तंभ एकतर गायब झाले आहेत किंवा मोडकळीस आले आहेत. अशाप्रकारे सीमा स्तंभाचे नुकसान होणे देशांतर्गंत सुरक्षा प्रतिष्ठानांसाठी धोक्याचा इशारा आहे.
सीमा स्तंभाची वाईट अवस्था केवळ पूर्व भागातील १,७५७ किमी लांब कुंपण नसलेल्या सीमेवर आहे असे नव्हे, तर भूतान सीमेवर देखील अशीच अवस्था आहे. भारत-भूतान सीमेवर सुमारे ९०० सीमा स्तंभ एकतर मोडकळीस आले आहेत किंवा पूर्णपणे नष्ट झाले आहेत. भारत-नेपाळ सीमेवरील एकूण १,४५१ सीमा स्तंभ बेपत्ता झाले आहेत आणि १,२८२ सीमा स्तंभ मोडकळीस आले आहेत, असे सुरक्षा संस्थेच्या जमीन प्रतिष्ठानाने गृहमंत्रालयाला कळविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)