नदी मन जोडते! महाकाली नदीचा प्रवाह बदलणार नाही, भारत-नेपाळमधील बैठकीत सहमती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:38 AM2022-12-08T10:38:57+5:302022-12-08T10:40:13+5:30
नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे.
नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारताच्या पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे नेपाळ-भारत सीमेवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि जिथे दोन्ही बाजूंनी तात्पुरता बंधारा काढून नदीला नैसर्गिक मार्गावर वाहू देण्यावर सहमती दर्शविली गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी भारतानं महाकाली नदीचा प्रवाह वळवण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता.
धारचुला दीरघचे मुख्य जिल्हा अधिकारी राज उपाध्याय यांनी सांगितले की, बुधवारी दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळने केलेल्या विनंतीनुसार १० दिवसांच्या आत तात्पुरत्या तटबंदीचा ढिगारा हटवण्याचे भारतानं मान्य केलं आहे. महाकाली नदी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे भारत आणि नेपाळ दरम्यान वाहते. या नदीवर भारतानं बांधलेल्या सुरक्षा भिंतीमुळे नदीचे पाणी नेपाळकडे वळवल्यानं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नेपाळमध्ये निर्माण झाली होती.
नेपाळचं भारताला पत्र
धारचुलामध्ये बुधवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेपाळी अधिकारी दिर्घराज उपाध्याय उपस्थित होते. "आम्ही डेब्रिज हटवण्याच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. १० दिवसांत ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल", अशी माहिती उपाध्याय यांनी दिली. तळबंधाच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादानंतर नेपाळने मंगळवारी भारताला पत्र पाठवलं होतं.
नेपाळी आणि भारतीय लोकांमध्ये संघर्ष
दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकार्यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, नेपाळच्या विनंतीनुसार भारतीय अधिकाऱ्यांनी १० दिवसांच्या आत बांधकाम हटविण्याचं मान्य केलं. धारचुलाचे मुख्य जिल्हा अधिकारी दीर्घराज उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, भारतीय अधिकाऱ्यांनी तटबंदी क्षेत्राची पाहणी केली आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळचे प्रतिनिधित्व धीरघराज उपाध्याय, सशस्त्र पोलिस दल धारचुलाचे डुंबर बिश्त, नेपाळ पोलिसांचे तारकराज पांडे आणि महाकाली नदी नियंत्रण प्रकल्पाचे कार्यवाहक प्रमुख करण सिंह धामी यांनी केलं. या काळात डीएम रीना जोशी आणि एसडीएम दिवेश मुन्नी यांनी भारतीय बाजूचं प्रतिनिधित्व केलं. यापूर्वी धारचुलामध्ये नेपाळी आणि भारतीय लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. यामध्ये एका नागरिकासह चार नेपाळी जखमी झाले.