''मॅगीनंतर आता नेस्लेचा 'पास्ता' धोकादायक?
By admin | Published: November 28, 2015 11:45 AM2015-11-28T11:45:29+5:302015-11-28T11:48:29+5:30
मॅगीपाठोपाठ नेस्ले कंपनीच्या पास्तामध्येही प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळले आहे.
ऑनलाइन लोकमत
महू (उत्तर प्रदेश), दि. २८ - प्रमाणापक्षा अधिक शिसे आढळल्याने अडचणीत सापडलेल्या 'मॅगी'वरील बंदी उठून अवघे काही दिवस उलटत असतानाच आता 'पास्ता'मध्येही मर्यादेपक्षा अधिक शिसे अढळल्याने 'नेस्ले' कंपीन पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. लखनौमधील प्रयोगशाळेत करण्यात आलेलया तपासणीत पास्तामध्येही मर्यादेहून अधिक शिसे आढळून अाले असून अहवालानुसार ते अपायकारक ठरले आहेत. मात्र आमची उत्पादने संपूर्णपणे सुरक्षित आहेत,असे नेस्लेतर्फे सांगण्यात आले.
सरकारी अधिका-यांनी १० जून रोजी ‘नेस्ले‘ कंपनीचे येथील वितरक ‘श्रीजी ट्रेडर्स‘कडून ‘पास्ता‘चे नमूने ताब्यात घेतले होते. मॅगीतील अपायकारक घटकांची तपासणी झाल्यानंतर पास्ताचे नमूने घेतले होते. माहू येथून घेतलेले नमूने लखनौ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्या नमुन्यांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात शिसे आढळून आले. २ सप्टेंबरच्या अहवालानुसार, ‘पास्ता‘चे नमूने अपायकारक ठरले, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे अधिकारी अरविंद यादव यांनी दिली आहे. पास्तामधील शिशाचे प्रमाण २.५ पीपीएम इतके असणे आवश्यक असते मात्र चाचणीत हे प्रमाण ६ पीपीएम इतके होते. यासंदर्भात मोदीनगर येथील ‘नेस्ले‘च्या कार्यालयाला माहिती देणारे पत्र पाठवण्यात आले, पण ते परत आले असे यादव यांनी सांगितले.