नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 02:10 PM2024-05-20T14:10:15+5:302024-05-20T14:11:23+5:30

...गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

Netai villagers strive for lasting peace, still fearing the incident that happened 13 years ago | नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती

नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती

काेलकाता : पश्चिम बंगालच्या जंगलाने वेढलेल्या 'जंगलमहाल' भागात जितक्या गोष्टी बदलतात, तितक्याच त्या तशाच राहतात, असे येथील नेताई गावातील रहिवाशांचा विश्वास आहे, जे अद्यापही 'त्या' घटनेतून सावरलेले नाही. ज्यात १३ वर्षांपूर्वी ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. पण त्याहून विशेष म्हणजे नेताई ग्रामस्थांच्या चिरस्थायी शांततेच्या शोधामुळे आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, तेथील लोक राजकारणापासून उदासीन झाले आहेत. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

जंगलमहाल भागातील झारग्राम जिल्ह्यातील बिनपूर तालुक्याच्या याच नेताई गावात, ७ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन सत्ताधारी स्थानिक माकप नेत्याच्या घरात आश्रय घेतलेल्या कथित सशस्त्र आंदोलनकर्त्यांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला, ज्यामध्ये चार महिला आणि पाच पुरुष मरण पावले.

याबाबत बोलताना स्थानिक रहिवासी सरजित रॉय म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे. ज्यांच्या आठवणी आजही आम्हाला सतावतात, त्या दिवसांत आता परत जायचे नाही. आम्हाला आणखी रक्तपात पाहायचा नाही आणि राजकारणाने आमच्या जीवनावर वर्चस्व गाजवावे अशी आमची इच्छा नाही, इथले लोक राजकारणात भाग घेण्यापेक्षा आपला उदरनिर्वाह करण्यावर अधिक भर देतात.

Web Title: Netai villagers strive for lasting peace, still fearing the incident that happened 13 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.