नेताजी झाले 'मुलायम', अखिलेशसाठी प्रचाराला सुरुवात
By admin | Published: February 6, 2017 01:41 PM2017-02-06T13:41:50+5:302017-02-06T13:43:26+5:30
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत आरोप - प्रत्यारोप करत यादवी माजवल्यानंतर मुलाच्या हट्टासमोर नेताजी पुन्हा एकदा 'मुलायम' पडल्याचं दिसत आहे
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 6 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत आरोप - प्रत्यारोप करत यादवी माजवल्यानंतर मुलाच्या हट्टासमोर नेताजी पुन्हा एकदा 'मुलायम' पडल्याचं दिसत आहे. 'अखिलेश यादव राज्याचे मुख्यमंत्री होतील, उद्यापासून मी निवडणूक प्रचाराला सुरुवात करेन', असं मुलायम सिंह यादव बोलले आहेत.
'आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. अखिलेशच उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. मी उद्यापासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करेन', असं मुलायम सिंह यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. शिवपाल यादव आणि अमर सिंह नाराज असल्याचं वृत्त मुलायम सिंह यांनी फेटाळलं आहे.
विशेष म्हणजे याआधी झालेल्या कोटुंबिक कलहानंतर मुलायम सिंह यादव यांनी अखिलेशला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मानण्यास नकार देत नवे आमदार स्वत: आपला नेता निवडतील असं सांगितलं होतं. त्याआधी मुलायम सिंह यांनी निवडणुकीत अखिलेशला पुर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं.
Shivpal naraz nahi hai. Kaun hai naraz? Koi bhi nahi hai: Mulaam Singh Yadav on reports of Shivpal Yadav being miffed #UPpollspic.twitter.com/Tqm1pwyPKb
— ANI UP (@ANINewsUP) February 6, 2017
समाजवादी पक्षाने काँग्रेसशी केलेल्या हातमिळवणीनंतर मुलायम सिंह यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी आपण पक्षासाठी प्रचार करणार नसल्याचंही ते बोलले होते. इतकंच नाही तर काँग्रेसला दिलेल्या 105 जागांवर निवडणूक लढण्याचं आवाहनही कार्यकर्त्यांना केलं होतं.