सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीनं केली नथुराम गोडसेची पूजा; म्हणे, ते आमच्या हृदयात वसतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:39 PM2019-11-21T12:39:38+5:302019-11-21T12:52:38+5:30

अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेची पूजा केली.

netaji subhash chandra bose great granddaughter rajyashri choudharyworships nathuram godse | सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीनं केली नथुराम गोडसेची पूजा; म्हणे, ते आमच्या हृदयात वसतात

सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीनं केली नथुराम गोडसेची पूजा; म्हणे, ते आमच्या हृदयात वसतात

Next

नवी दिल्लीः सुभाषचंद्र बोस यांची पणती आणि अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेची पूजा केली. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या एका फोटोमध्ये राजश्री चौधरी आपल्या समर्थकांसह गोडसेची आरती ओवाळत असताना पाहायला मिळतायत. मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला असून, फोटोमध्ये राजश्री चौधरी पूजा करताना दिसत आहेत. एका जागी नथुराम गोडसे आणि झांसीच्या राणीचे फोटो ठेवण्यात आलेले आहेत.

जवळपास डझनांहून अधिक लोक गोडसेची स्तुती करत आरती म्हणत आहेत. नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महासभेचे केंद्रीय नेते होते आणि आजही ते आमच्या हृदयात आहेत. काँग्रेस सरकारनं त्यांना बदनाम केलं. एक अशी वेळ येईल, जेव्हा सगळ्यांना खरा इतिहास समजेल, असंही राजश्री चौधरी म्हणाल्या आहेत. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर ग्वाल्हेरमध्ये खोटं एफआयआर दाखल करण्यात आलं. ते लागलीच मागे घेतलं पाहिजे. जर हे एफआयआर मागे घेतले गेलं नाही, तर आमचे कार्यकर्ते संसदेला घेराव घालतील. 

हिंदू महासभेच्या सदस्यांनी ग्वाल्हेरमध्ये गोडसेचा 70वा बलिदान दिवस साजरा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेच्या सदस्यांविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवलं आहे. राजश्री चौधरींनी हे एफआयआर सूडबुद्धीनं दाखल केल्याचा आरोप केला असून, ते मागे घेण्याची मागणी केली आहे. 

Web Title: netaji subhash chandra bose great granddaughter rajyashri choudharyworships nathuram godse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.