नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीय पाहणार 'रंगून'
By admin | Published: February 22, 2017 11:29 AM2017-02-22T11:29:48+5:302017-02-22T11:34:33+5:30
'रंगून'चे निर्माते आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांना हा सिनेमा दाखवण्यासाठी तयारी करत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - कंगना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा 'रंगून' दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सिनेमाची कहाणी सन 1940 च्या दरम्यानची आहे. यामध्ये देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जवानांनी दिलेला उत्स्फुर्त लढादेखील पाहायला मिळणार आहे.
हा तोच काळ आहे, ज्यादरम्यान सुभाषचंद्र बोसदेखील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिकेत होते. या कारणामुळे 'रंगून'चे निर्माते आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांना हा सिनेमा दाखवण्यासाठी तयारी करत आहेत.
कोलकातामध्ये ज्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीय राहतात, त्याच ठिकाणी 'रंगून'चे निर्माते सिनेमाच्या स्क्रीनिंगचे आयोजन करणार आहेत.
दरम्यान, सिनेमामध्ये नेताजींची भूमिका पाहायला मिळणार आहे की नाही, ही बाब अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र 'रंगून' सिनेमा दाखवण्याची मागणी नेताजींच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. 'रंगून' हा सिनेमा दुस-या महायुद्धादरम्यानच्या कटकारस्थान, युद्ध आणि प्रेम कहाणीवर आधारित आहे.
सिनेमाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांना रंगून सिनेमा दाखवण्यामागील प्रमुख कारण म्हणजे याच काळादरम्यान सुभाषचंद्र बोसदेखील देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी लढा देत होते'. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगनानं 'रंगून'चे प्रमोशन करण्यासाठी जम्मू काश्मीर येथे जाऊन जवानांची भेट घेतली. 'रंगून' सिनेमाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज असून येत्या 24 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.