नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांचा भाजपमधून राजीनामा; 'हे' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 06:14 PM2023-09-06T18:14:35+5:302023-09-06T18:16:36+5:30

Chandra Kumar Bose Resigns: 'मी जो विचार घेऊन भाजपमध्ये आलो, तो कधीच पूर्ण झाले नाही.'

Netaji Subhash Chandra Bose's grandnephew Chandra Kumar Bose resigns from BJP | नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांचा भाजपमधून राजीनामा; 'हे' कारण...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांचा भाजपमधून राजीनामा; 'हे' कारण...

googlenewsNext

Chandra Bose Resigns from BJP: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस (Chandra Kumar Bose) यांनी भाजपमधून (BJP) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या शुभेच्छा पक्षासोबत आहेत, मात्र पक्षाने सर्व समाजाला एकत्र केले पाहिजे, असे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले.

चंद्र कुमार बोस हे 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचे उपाध्यक्ष होते, पण त्यांना 2020 मध्ये पदावरुन हटवण्यात आले. चंद्र कुमार बोस यांनी राजीनामा देताना सांगितले की, मी 2016 मध्ये भाजपसाठी काम केले. मला पंतप्रधान मोदींचे काम मला आवडले होते. पण, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाटले की, पक्षात ज्यापद्धतीचे राजकारण सुरू आहे, ते माझ्या आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शाप्रमाणे नाही. नेताजी जातीयवादी आणि फुटीरतावादी राजकारणाविरुद्ध लढले.

त्यांनी पुढे लिहिले, सुभाषचंद्र बोस आणि सरतचंद्र बोस यांच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मला केंद्रातून किंवा राज्य पातळीवरुन कोणताही पाठिंबा मिळाला नाही. मी बंगालमधील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्र लिहून रणनीती सुचवली होती. पण माझ्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करण्यात आले. माझ्या प्रस्तावाचे पालन होत नसेल, तर पक्षासोबत राहून काही उपयोग नाही. या दुर्दैवी परिस्थितीमुळे मला भाजपचा सदस्य म्हणून राहणे अशक्य झाले आहे. 

भाजपमध्ये येण्याचा उद्देश काय होता?
पीटीआयशी बोलताना चंद्र कुमार बोस म्हणाले की, भाजपमध्ये येण्याचा माझा उद्देश शरतचंद्र बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धर्मनिरपेक्ष विचारधारा देशासमोर मांडणे हा आहे. आझाद हिंद मोर्चा काढावा, असे मी स्पष्टपणे सांगितले होते. या आघाडीचे नेतृत्व माझ्याकडे द्यायला हवे होते, पण ती कधीच स्थापन झाली नाही.

 

Web Title: Netaji Subhash Chandra Bose's grandnephew Chandra Kumar Bose resigns from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.