नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शेवटच्या सैनिकाचे निधन

By Admin | Published: February 6, 2017 01:42 PM2017-02-06T13:42:23+5:302017-02-06T13:42:23+5:30

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील शेवटचे सैनिक कर्नल निजामुद्दीन यांचं निधन

Netaji Subhash Chandra Bose's last soldier dies | नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शेवटच्या सैनिकाचे निधन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शेवटच्या सैनिकाचे निधन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
आझमगड, दि. 6 - नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे ड्रायव्हर राहिलेले कर्नल निजामुद्दीन यांचं निधन झालं आहे. बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील ते शेवटचे सैनिक होते. ते 116 वर्षांचे होते. आझमगडच्या मुबारकपूर परिसरातील ढकवा येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.  
 
बोस यांच्या मृत्यूबाबत वारंवार येणा-या वृत्ताबाबत ते म्हणाले होते, 20 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी बोस यांना बर्मा या देशातील छितांग नदीजवळ एका बोटीत सोडलं होतं त्यानंतर त्यानंतर पुन्हा बोस यांच्यासोबत भेट झाली नाही. 
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभेसाठी वाराणसीमधून लढताना कर्नल निजामुद्दीन यांचा आशीर्वाद घेतला होता.  कर्नल निजामुद्दीन यांची पत्नी अजून जिवंत असून त्या 107 वर्षांच्या आहेत. निजामुद्दीन यांनी अखेरच्या क्षणापर्यंत आझाद हिंद सेनेचे ओळखपत्र सांभाळून ठेवलं होतं.
 

Web Title: Netaji Subhash Chandra Bose's last soldier dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.