नेताजी सुभाष चंद्र खरोखर विमान अपघातात सापडले - ब्रिटिश वेबसाईटचा दावा
By admin | Published: January 9, 2016 06:24 PM2016-01-09T18:24:30+5:302016-01-09T18:24:30+5:30
हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे विमान अपघातानंतरचे शब्द होते असा दावा एका www.bosefiles.info या ब्रिटिश वेबसाईटने केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ९ - हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे विमान अपघातानंतरचे शब्द होते असा दावा एका www.bosefiles.info या ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय मृत्यूवर प्रकाश टाकणारे प्रत्यक्षदर्शींचे जबाब एका ब्रिटिश वेबसाईटने खुले केले आहेत. www.bosefiles.info असं या साईटचं नाव असून जी माहिती दिलीय प्रत्यक्षदर्शी तसेच ब्रिटिश गुप्तचरखात्याच्या अहवालावर आधारीत असल्याचंही म्हटलंय. नेताजी १८ ऑगस्ट १९४८ या दिवशी विमानअपघातात तैवान येथे मृत्युमूखी पडल्याचं सांगण्यात येत होतं.
प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याच्या आधारे या साईटवर असं सांगण्यात आलं आहे की, या दिवशी या जापनीज बाँबर विमानाला व्हिएतनाम येथल्या टुरान या विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर ३० ते ४० मीटर अंतरावर उडाल्यावर लगेचच स्फोट होत आग लागली. धावपट्टीपासून १०० मीटर अंतरावर हे विमान कोसळलं. कर्नल हबीब उर रेहमान यांच्यासह नेताजी भाजलेल्या अवस्थेत विमानातून बाहेर आले. ते पेट्रोलच्या टाकीजवळ बसलेले असल्याने त्यांना जास्त जखमा झाल्या असाव्यात असं नमूद करण्यात आलं आहे.
बाहेर पडल्यानंतर झालेला संवाद रेहमान यांनी नोंदवल्याचं सांगण्यात आलं आहे. तुम्हाला जास्त तर लागलं नाही असं विचारणा-या नेताजींनी रेहमान यांना सांगितलं की, ज्या वेळी तुम्ही भारतात परत जाल, तेव्हा माझ्या भारतीय बांधवांना सांगा की मी शेवटच्या क्षणापर्यंत भारताच्या आझादीसाठी लढत होतो. आझादीसाठी युद्ध सुरू ठेवण्याचा आदेशही बोस यांनी रेहमान यांच्यामार्फत दिला.
यानंतर बोस यांना गंभीर जखमी अवस्थेत नानमोन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काय झालं, हे १६ जानेवारी रोजी वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल असं सांगत या साईटनं उत्कंठा ताणण्याचा खेळ केला आहे.