विभाजनकारी राजकारणाचा नेताजींनी केला होता विरोध - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 04:21 AM2020-01-24T04:21:58+5:302020-01-24T04:22:18+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिंदू महासभेच्या विभाजनकारी राजकारणाला विरोध केला होता आणि ते धर्मनिरपेक्ष व एकजूट अशा भारतासाठी लढले होते, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
दार्जिलिंग : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिंदू महासभेच्या विभाजनकारी राजकारणाला विरोध केला होता आणि ते धर्मनिरपेक्ष व एकजूट अशा भारतासाठी लढले होते, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, नेताजींनी आपल्या संघर्षातून हा संदेश दिला की, सर्व धर्मांचा सन्मान केला जावा. एकजूट भारतासाठी लढणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नेताजी हे धर्मनिरपेक्ष भारतासाठी लढले. मात्र, आता धर्मनिरपेक्षतेचे पालन करणाऱ्यांना बाहेर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
भारत नेहमीच नेताजींचा कृतज्ञ राहील : मोदी
सुभाषचंद्र बोस यांचे साहस आणि वसाहतवादाविरोधातील लढाईतील त्यांचे मोठे योगदान यासाठी भारत नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)