हिंदुत्व विसरलात का?; ममतांवरची शिवसेनेची 'ममता' पाहून नेटकऱ्यांचा 'रोखठोक' सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 02:47 PM2018-03-27T14:47:58+5:302018-03-27T14:49:00+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांना नेटीझन्सनी विचारला हिंदुत्ववादासंदर्भात खडा सवाल...
नवी दिल्ली - 2019मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. भाजपाचा पाडावा करण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये बैठकांवर बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात लढण्यासाठी बिगर काँग्रेस पक्षांची तिसरी आघाडी स्थापण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नवी दिल्लीच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान त्या भाजपाविरोधी पार्टीतील नेत्यांची भेट घेत आहेत.
मंगळवारी (27 मार्च) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ममतांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बीजेडी आणि डीएमकेच्या नेत्यांचीही भेट घेतली. मात्र, या भेटीवरुन संजय राऊत यांच्यावर नेटीझन्सनी हिंदुत्ववादावरुन प्रश्नांचा भडीमार केला आहे. संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. संजय राऊत-ममता बॅनर्जींच्या भेटीवर नेटीझन्सनी प्रचंड टीका करत हिंदुत्ववादाचा सवाल निर्माण केला. शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?, असा प्रश्न नेटीझन्सनी उपस्थित केला आहे.
काय म्हणालेत नेमके नेटीझन्स?
Meet mamta banarjee
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2018
Delhi pic.twitter.com/hx58D82pds
साहेब एक विनंती आहे नरेंद्र मोदीना विरोध म्हणुन
— Ganesh dhonde (@Ganesh74443271) March 27, 2018
एका हिंदु विरोधी बाई सोबत आपलयाला जायचे नाही
एक कट्टर शिव सैनिक "जय महाराष्ट्र"
बंगाल मध्ये हिंदू मारले जातायत आणि तुम्ही निर्लज्जपणे ममता बानोच्या बाजूला बसलात... आज बाळासाहेब असते तर नक्की तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं असते...@ShivSena
— Kirtikumar Bandekar (@KirtikumarB) March 27, 2018
शिव सेना अगर BJP से अलग हुई तो १ सीट भी नहीं आएगि,इनका नेता भी राहुल से कम नहीं है।😂😂फिर मोदी को लाना है,देश को बचाना है।।✌️✌️
— Chota Bheem (@chotabheemRG) March 27, 2018
हिंदूत्व गेले चूलीत. बंगालात बाई हिंदूंना मारेना का, काय?
— Proud Indian (@prajakta_s_c) March 27, 2018
तिकडे बंगाल मध्ये तृणमूल नी हैदोस घातलाय हिन्दू विरोधात अणि हे चहा पीत बसलेत.... वाह रे चिवचिव सेना
— Pritam Kothadiya (@pritamkothadiya) March 27, 2018
I am sure Balasaheb wouldn't have like her for her anti hindu agenda
— Samir Paleja (@samirpaleja) March 27, 2018