पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 01:19 PM2018-06-14T13:19:00+5:302018-06-14T13:25:51+5:30

नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची काही जणांनी स्तुती केली आहे, तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ, फोटो, ट्विट्सनी सोशल मिडीयात सध्या धूमाकूळ घातला आहे. 

Netizens ridicule Prime Minister Narendra Modi's fitness video | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण करत एक व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर शेअर केला. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत. दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. 
नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटिझन्सकडून सोशल मिडीयात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये काही जणांनी नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची स्तुती केली आहे, तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ, फोटो, ट्विट्सनी सोशल मिडीयात सध्या धूमाकूळ घातला आहे. 




काल (दि. 14) नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फिटनेसचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत मोदींनी उल्लेख केलेला पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेला वॉकिंग ट्रेक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वास्तूत अशाप्रकारचा ट्रॅक अस्तित्त्वात असल्याचे समोर आले आहे. 




या ट्रॅकबद्दल माहिती देताना मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो.  त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते, असे मोदींनी म्हटले आहे. एका झाडाभोवती वर्तुळाकार कक्षेत हा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकचे वेगवेगळे भाग करण्यात आले असून त्यामध्ये हिरवळ, माती, दगडगोटे, पाणी आणि रेती ठेवण्यात आली आहे. 



 





 

Web Title: Netizens ridicule Prime Minister Narendra Modi's fitness video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.