"ओवैसीला पैसे देऊन विकत घेऊ शकेल असा कोणी आतापर्यंत जन्माला नाही आला"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 03:38 PM2020-12-16T15:38:40+5:302020-12-16T15:42:38+5:30

Asaduddin Owaisi And Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या विधानावर आता ओवैसींनी भाष्य केलं आहे. 

never was man born who can buy asaduddin owaisi aimim chief reply to mamata banerjee | "ओवैसीला पैसे देऊन विकत घेऊ शकेल असा कोणी आतापर्यंत जन्माला नाही आला"

"ओवैसीला पैसे देऊन विकत घेऊ शकेल असा कोणी आतापर्यंत जन्माला नाही आला"

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ममता बॅनर्जी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. एका प्रचार रॅली दरम्यान भाजपावर निशाणा साधताना त्यांना भाजपा असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या या विधानावर आता ओवैसींनी भाष्य केलं आहे. 

"ओवैसीला पैसे देऊन विकत घेऊ शकेल असा कोणी आतापर्यंत जन्माला नाही आला" असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. "मला विकत घेऊ शकेल असा कोणी जन्माला नाही आला. त्यांचे आरोप निराधार आहेत व त्या अस्वस्थ आहेत. त्यांनी आपल्या घराची काळजी केली पाहिजे, कारण त्यांचे अनेक लोकं भाजपात जात आहेत. त्यांनी बिहारचे मतदार व आमच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांचा अपमान केला आहे" असं देखील ओवैसींनी म्हटलं आहे. 

 पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला केला. राष्ट्रगीत बदलण्याच्या मागणीवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे. "हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल" असं खुलं आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

"हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं…"; ममता बॅनर्जींचं खुलं आव्हान

ममता यांनी भाजपाला समुदायांमध्ये दंगे आणि द्वेष पसरवणारा नवा धर्म असं देखील एका सभेला संबोधित करताना म्हटलं आहे. राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. यावरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जर भाजपाने असं काही करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत. आपलं राष्ट्रगीत बदलण्याच्या गोष्टी करत आहेत" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

Web Title: never was man born who can buy asaduddin owaisi aimim chief reply to mamata banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.