‘निर्भया’च्या खुन्याचा फाशीविरुद्ध नवा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 04:03 AM2020-03-01T04:03:40+5:302020-03-01T04:03:51+5:30
डिसेंबर, २०१२मधील दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंड झालेल्या चारही खुन्यांच्या येत्या ३ मार्च रोजी ठरलेली फाशी स्थगित केली जावी
नवी दिल्ली : डिसेंबर, २०१२मधील दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंड झालेल्या चारही खुन्यांच्या येत्या ३ मार्च रोजी ठरलेली फाशी स्थगित केली जावी, यासाठी एक नवा अर्ज शनिवारी सत्र न्यायालयात दाखल केला गेला.
अक्षय सिंग व पवन कुमार या दोघांनी केलेल्या या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी तिहार कारागृह प्रशासनास नोटीस काढून सुनावणी सोमवारी २ मार्च रोजी ठेवली. अक्षयने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज व पवन कुमारने सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव याचिका’ केली असल्याने, त्यांचा निकाल होईपर्यंत ‘डेथ वॉरन्ट’ची अंमलबजावणी केली जाऊ नये, यासाठी हा नवा अर्ज करण्यात
आला आहे.
दरम्यान, फाशी देण्यास टाळाटाळ करून या खुन्यांना शारीरिक व मानसिक यातना देण्यात आल्या, त्यामुळे मानवाधिकार आयोगास
याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यास सांगावी, अशी आणखी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.