न्यू बी.जे. मार्केट परिसरात दोन गट भिडले
By admin | Published: March 30, 2016 12:25 AM2016-03-30T00:25:44+5:302016-03-30T00:25:44+5:30
जळगाव : हॉकर्स स्थलांतराच्या विषयावरून न्यू बी.जे. मार्केट परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन गट परस्परात भिडले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जिल्हापेठ पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून जमावाची पांगवापांगव केल्यामुळे अनर्थ टळला.
Next
ज गाव : हॉकर्स स्थलांतराच्या विषयावरून न्यू बी.जे. मार्केट परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन गट परस्परात भिडले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जिल्हापेठ पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून जमावाची पांगवापांगव केल्यामुळे अनर्थ टळला.महापालिकेच्या वतीने सुभाष चौकातील विक्रेत्यांचे अतिक्रमण काढून त्यांना व्यवसायासाठी न्यू बी.जे. मार्केट परिसरात पर्यायी जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी मार्केटच्या आवारातील जागेवर पे मारण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी लकी-ड्रॉ पद्धतीने हॉकर्सना जागेचे वाटप केले जाणार आहे. मात्र, महापालिकेचे अधिकारी आपल्या मर्जीतील लोकांना मोक्याच्या जागा वाटप करीत असल्याच्या गैरसमजुतीतून मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास याठिकाणी हॉकर्स लोकांच्या दोन गटांत शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने धक्काबुक्की होऊन हाणामारी झाली. जमलेल्या जमावातील लोकांनी आरडाओरड केल्याने शांततेला गालबोट लागले. त्यानंतर क्षणातच लाठ्या-काठ्या, लाकडी दांडके घेऊन जमावातील काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हाणामारी तीन ते चार जण किरकोळ स्वरुपात जखमी झाले.पोलीस घटनास्थळी दाखलया घटनेची माहिती होताच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, अल्ताफ पठाण, रवी नरवाडे, छगन तायडे, अजित पाटील, दत्तात्रय राणे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सुरुवातीला जमावाला तेथून पांगवले. त्यानंतर काहींची समजूत काढून त्यांनाही तेथून रवाना केले. पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची या परिसरात पेट्रोलिंग सुरू होती.