न्यू बी.जे.त डेली बाजार सुरू हॉकर्सच्या एका रांगेला विरोध: व्यापार्‍यांनी पाळला बंद; आयुक्तांचा चार तास ठिय्या

By admin | Published: April 5, 2016 12:14 AM2016-04-05T00:14:26+5:302016-04-05T00:14:26+5:30

जळगाव : न्यू बी.जे. मार्केटमध्ये लॉट्स टाकून दिलेल्या जागेत हॉकर्सने सोमवारी सकाळी आपली दुकाने थाटली. मात्र सिव्हील हॉस्पिटलकडील भागातील चौथ्या रांगेस स्थानिक व्यापार्‍यांचा विरोध होता. प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठार राहिल्याने व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तब्बल सहा दिवसानंतर भाजी विक्रेते व अन्य व्यावसायिकांची दुकाने लागल्याने रोजी-रोटीचा प्रश्न मिटल्याचे समाधान अनेकांच्या चेहेर्‍यावर होते.

New Bj's Daily Market Opposes Hookers to a Range; Commissioner for four hours | न्यू बी.जे.त डेली बाजार सुरू हॉकर्सच्या एका रांगेला विरोध: व्यापार्‍यांनी पाळला बंद; आयुक्तांचा चार तास ठिय्या

न्यू बी.जे.त डेली बाजार सुरू हॉकर्सच्या एका रांगेला विरोध: व्यापार्‍यांनी पाळला बंद; आयुक्तांचा चार तास ठिय्या

Next
गाव : न्यू बी.जे. मार्केटमध्ये लॉट्स टाकून दिलेल्या जागेत हॉकर्सने सोमवारी सकाळी आपली दुकाने थाटली. मात्र सिव्हील हॉस्पिटलकडील भागातील चौथ्या रांगेस स्थानिक व्यापार्‍यांचा विरोध होता. प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठार राहिल्याने व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तब्बल सहा दिवसानंतर भाजी विक्रेते व अन्य व्यावसायिकांची दुकाने लागल्याने रोजी-रोटीचा प्रश्न मिटल्याचे समाधान अनेकांच्या चेहेर्‍यावर होते.
गेल्या आठवड्यात मंगळवारी महापालिका अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात सुभाष चौक परिसरातील चौबे मार्केट, सालार मार्केट भागातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. त्या दिवसापासून या भागातील हॉकर्सची दुकाने बंदच होती. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न यामुळे गंभीर झाला होता. अखेर शनिवारी लॉट्स पाडून सोडत पद्धतीने हॉकर्सला न्यू. बी.जे. मार्केटमधील जागा देण्यात आल्या. नव्या जागेत सोमवारपासून व्यवसाय सुरू करावा अशा प्रशासनाच्या सूचना होत्या.
सकाळी झाली गर्दी
सकाळी ८ वाजता हळू हळू न्यू बी.जे. मार्केट परिसरात हॉकर्स यायला सुरुवात झाली. एका भागात तीन रांगा व दुसर्‍या भागात चार रांगा अशा पद्धतीने ३ बाय ५ साईजमध्ये दिलेल्या जागेत ग्राहकांना येण्याजाण्यास अडचण होईल म्हणून हॉर्कसने प्रथम नाराजी व्यक्त केली. यातून वाद होईल असे काहींचे म्हणणे होते. मात्र हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे ठरवून सर्वांनी आपली दुकाने थाटली.
इन्फो
-----
एका हॉकर्सने आपलेल्या मिळालेल्या जागेत सकाळी ९ वाजता विधीवत पूजेस प्रारंभ केला. तो सपत्नीक पूजा विधी करत असताना इतरांनाही प्रोत्साहन आले. त्यांनीही पूजा करून व्यवसायास प्रारंभ केला. ९.३० पर्यंत हळू हळू ३५ ते ४० भाजी विक्रेत्यांची दुकाने या भागात लागलेली दिसत होती. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व अधिकारी हॉकर्सला भेटून दुकाने लावण्याचे आवाहन करत त्यांना धीर देताना दिसत होते. १२ वाजेच्या सुमारास तर नव्या जागेत भाजी खरेदीस ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र या भागात दिसून आले.
--------

Web Title: New Bj's Daily Market Opposes Hookers to a Range; Commissioner for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.