केजरीवालांवर नवा दावा

By admin | Published: May 23, 2017 06:59 AM2017-05-23T06:59:56+5:302017-05-23T06:59:56+5:30

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात १० कोटी रुपयांचा बदनामीचा नवा दावा दाखल केला आहे.

New claim on Kejriwal | केजरीवालांवर नवा दावा

केजरीवालांवर नवा दावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात १० कोटी रुपयांचा बदनामीचा नवा दावा दाखल केला आहे.
अरुण जेटली यांनी केजरीवाल यांच्यावर याआधीही १० कोटींचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. त्यात गेल्या आठवड्यात केजरीवाल यांच्या वतीने उलटतपासणी घेताना ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेटलींना उद्देशून ‘क्रूक ’ (लबाड, अप्रामाणिक) म्हटले होते. यावरून जेटली व जेठमलानी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली होती. एवढेच नव्हे, तर आपण हा शब्द अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच वापरल्याचे जेठमलानी यांनी सांगितले होते.
केजरीवाल त्यांच्यावरील बदनामी दाव्यात स्वत:चा बचाव करताना अशा प्रकारे आपली बदनामी करणार असतील, तर आपण त्यांच्याविरुद्ध बदनामीचा आणखी एक दावा लावू, असा इशारा जेटली यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी सोमवारी हा नवा दावा दाखल केला.

Web Title: New claim on Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.