आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर भर नव्या आयुक्तांचा प्राधान्यक्रम : २२ वर्षांचा अनुभवही कमी पडला- कापडणीस
By Admin | Published: June 17, 2016 11:08 PM2016-06-17T23:08:23+5:302016-06-17T23:08:23+5:30
जळगाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
ज गाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.बोर्डे यांनी शुक्रवारी सायंकाळी पालिकेची सूत्रे हाती घेतली. मावळते आयुक्त संजय कापडणीस या वेळी उपस्थित होते. यानिमित्त बोर्डे यांचे स्वागत व कापडणीस यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रमही सभागृहात झाला. अभ्यास करून अधिक बोलता येईलपालिकेची स्थिती बिकट असल्याने प्राधान्यक्रम कुठला हा मुद्दा स्पष्ट करता येणार नाही. परंतु आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह इतर अडचणी दूर करू. त्यासाठी अभ्यास केला जाईल, असे बोर्डे म्हणाले. स्वच्छता, वृक्षारोपणाला महत्त्वपालिकेची स्थिती सुधारण्यासोबत आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण याबाबतही काम करू. वृक्षारोपण केले जाईल, असेही बोर्डे यांनी सांगितले. सर्वांचे सहकार्य हवेपालिकेत काम करताना, प्रकल्प पूर्ण करताना सर्वांच्या सहकार्याची गरज असेल. त्यात पदाधिकार्यांची महत्त्वाची साथही हवी असेल, असेही बोर्डे यांनी स्पष्ट केले. जुन्या आयुक्तांचे प्रकल्प पूर्ण करूजुन्या आयुक्तांनी जे प्रकल्प हाती घेतले होते, ते पूर्ण केले जातील. त्याबाबतचे काम थांबविले जाणार नाही, असेही बोर्डे यांनी स्पष्ट केले. २२ वर्षांचा अनुभवही कमी पडलानिरोप समारंभात सत्काराला उत्तर देताना जुने आयुक्त कापडणीस म्हणाले, पालिकेत वाद झाले असतील, पण प्रत्येकाने शहर विकासासाठी आपली भूमिका मांडली. कुठलेही वाद वैयक्तिक नव्हते. कधी दुजाभाव करून काम केले नाही, कारवाई केली नाही. परंतु या महापालिकेतील कामाची पद्धत वेगळीच होती, शैली वेगळी होती. त्यामुळे माझा २२ वर्षांचा प्रशासनातील कामाचा अनुभवही कमी पडला. पालिकेची नाजूक आर्थिक स्थिती, वेतन असे अनेक प्रश्न आहेत. परंतु नवे आयुक्त बोर्डे हे नगरपालिकेचा अनुभव घेऊन आले आहे. ते निश्चितच चांगले काम करतील, त्यांचा अनुभव येथे कामी येईल, असेही कापडणीस म्हणाले. पाणी वितरण व्यवस्था चांगली नव्हतीशहरातील पाण्याची वितरण व्यवस्था चांगली नव्हती. गाळे, आरोग्य, स्वच्छता, कर्ज असेे अनेक प्रश्न होते. परंतु कर्मचार्यांनी सामूहिक प्रयत्न करून त्यावर काम केले. कुठली तक्रार येऊ दिली नाही, असेही कापडणीस म्हणाले.