"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 01:33 PM2024-10-21T13:33:13+5:302024-10-21T13:36:56+5:30
चेन्नई येथे हिंदू धार्मिक आणि एंडॉवमेंट बोर्डाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. येथे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत 31 जोडप्यांचे लग्न झाले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यानंतर आता तामिळनाडचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही लोकांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. "अता नवविवाहीत जोडप्यांनी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे," असे मुख्यमंत्री स्टॅलिन यानी म्हटले आहे.
चेन्नई येथे हिंदू धार्मिक आणि एंडॉवमेंट बोर्डाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. येथे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत 31 जोडप्यांचे लग्न झाले. यावेळी, कदाचित जोडप्यांनी 16 प्रकारच्या संपत्तीऐवजी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे, असे स्टॅलीन यांनी म्हटले आहे.
सीएम एमके स्टॅलिन यांनी मानव संसाधन आणि सामाजिक न्याय मंत्री शेखर बाबू यांचे कौतुक करत दावा केला की, द्रमुक सरकारने मंदिरांची देखभाल आणि संसाधने सुलभ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे खरे भक्त कौतुक करतात. तसेच, जे कोल भक्तीचा मुखवट्या प्रमाणे वापर करतात, ते लोक गडबडलेले आहेत आणि डीएमके सरकारच्या यसाला आवाहन देत तक्रार दाखल करत आहेत.
सीएम स्टॅलिन म्हणाले, आपली लोकसंख्या कमी होत आहे. याचा परिणाम आपल्या लोकसभांच्या जागांवरही होईल. यामुळे आपण 16-16 मुले जन्माला घालायला हवीत. स्टॅलीन यांनी दावा केला आहे की, पूर्वी जोडपे 16 प्रकारची संपत्ती मिळवण्याचा आशीर्वाद देत होते. यामुळे, कदाचित आता 16 प्रकारच्या सपत्तीऐवजी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे.
ते म्हणाले, "वृद्ध मंडळी म्हणत की, 16 संतानं प्राप्त करा आणि समृद्ध जीवन जगा, याचा अर्थ 16 मुले नसून 16 प्रकारची संपत्ती असा होता. याचा उल्लेख लेखक विश्वनाथन यांनी आपल्या पुस्तकात गाय, घर, पत्नी, मुले, शिक्षण, जिज्ञासा, ज्ञान, अनुशासन, भूमी, जल, आयु, वाहन, सोनं, संपत्ती, फसल आणि प्रशंसा, यांच्या स्वरुपात केला आहे. मात्र आता आपल्याला कुणीही 16 संपत्ती प्राप्त करण्याचा आशीर्वाद देत नाही, तर केवळ पुरेशी मुले होण्याचा आणि समृद्ध जीवन जगण्याचा आशीर्वाद देतात.
यापूर्वी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, एन. चंद्रबाबू नायडू यांनी रविवारी वाढत्या वृद्ध लोकसंख्येसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. याचा हवाला देत त्यांनी दक्षिणेकडील राज्यांतील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही तर, "सरकार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविता याव्यात, यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहे," असेही नायडू यांनी म्हटले होते.