Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:47 AM2021-04-26T11:47:26+5:302021-04-26T11:48:14+5:30

Coronavirus : सीएसआयआरने आपल्या वीस लॅबोरेटरीच्या मदतीने 10,427 लोकांवर सिरो सर्व्हे केला होता. यात कॉन्ट्रॅक्टवर असणारे कर्माचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी होते.

new covid outbreak could be due to lack of antibodies in seropositive people csir survey | Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण...

Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण...

Next
ठळक मुद्देभारतात सध्या कोरोना रुग्णाांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नवे कोरोनाची नोंद दिसून येत आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान काउन्सिल फॉर साइन्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) च्या सर्व्हेतून कोरोना संसर्ग वाढीच्या कारणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाट आलेली असतानाही लोकं आजारी पडण्यामागे एक कारण हे देखील असू शकतं की सिरो सर्वेक्षणात पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये कोणतीही विशिष्ट अँटी बॉडी अस्तित्वात नसेल, ज्यामुळे ते संसर्गासोबत लढा देतील, असे सर्व्हेमध्ये म्हटले आहे. (new covid outbreak could be due to lack of antibodies in seropositive people csir survey)

सीएसआयआरने आपल्या वीस लॅबोरेटरीच्या मदतीने 10,427 लोकांवर सिरो सर्व्हे केला होता. यात कॉन्ट्रॅक्टवर असणारे कर्माचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी होते. हे लोक केंद्रशासित प्रदेशांसह 17 राज्यांमधील निवासी आहेत. 10,427 लोकांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पॉझिटिव्हीटी रेट 10.14 टक्के होता. 

सर्व्हेच्या मुख्य लेखकांपैकी एक असलेल्या शांतनू गुप्ता यांनी सांगितले की, मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये अँटीबॉडीजच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याच कारणामुळे लोक अधिक प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळत होती. मात्र, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट येण्यास सुरुवात झाली होती. 

सर्व्हेनुसार, पाच ते सहा महिन्यांनंतर सिरो पॉझिटिव्ह लोकांमध्ये महत्त्वपूर्ण न्यूट्रीलायझेशन अॅक्टिव्हिटीची कमी दिसली. CSIR च्या डेटामध्ये अशी माहिती मिळाली, की अँटी-एनसी (न्यूक्लियोकॅप्सिड) अँटीबॉडी वायरल आणि इन्फेक्शनविरोधात दीर्घ काळासाठी सुरक्षा प्रदान करते. आपण आणखी कडक निर्बंध लादल्यास शरिरात न्यूट्रीलायझेशनलची मोठी कमी जाणवू शकते. याच कारणामुळे मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक झपाट्याने वाढत असल्याचे शांतनू गुप्ता यांनी म्हटले आहे.

भारतात सध्या कोरोना रुग्णाांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नवे कोरोनाची नोंद दिसून येत आहे. सर्व्हेमध्ये म्हटले आहे की, देशातील अनेक ठिकाणी केलेल्या अभ्यासानुसार सिरो पॉझिटिव्हिटी रेट 10.14 टक्के येण्याचा अर्थ असा होतो, की भारतात अनेक ठिकाणी सप्टेंबर 2020 मध्ये लोक कोरोनातून बरे झाले होते. विशेषतः ते लोक जे लोकांच्या संपर्कात अधिक येतात आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. याच कारणामुळे ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली होती. या काळात लोकांच्या शरिरात प्रतिकारशक्ती तयार झाली होती, मात्र ही रोगप्रतिकारशक्ती इतकीही नव्हती की भविष्यातही कोरोनाचा संसर्ग रोखू शकेल.

(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार ! गेल्या २४ तासांत ३,५२,९९१ नवे रुग्ण, २८१२ जणांचा मृत्यू)

दरम्यान, महाराष्ट्रात मार्चनंतर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे, की या सर्वेक्षणात 24 शहरांमधील लोक सहभागी होते आणि यातून मार्च 2021 च्या आधी देशात पसरलेल्या कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. तसेच, सप्टेंबर २०२० पर्यंत भारतातील बहुतेक लोक कोरोनातून बरे झाले होते आणि त्यांच्यात रोगप्रतिकारशक्तीही तयार झाली होती. हा सर्व्हे जूनमध्ये केला गेला होता. यानंतर देशात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होऊ लागले होते. सोबतच रुग्णसंख्याही कमी होत होती, असेही यामध्ये म्हटले आहे.
 

Web Title: new covid outbreak could be due to lack of antibodies in seropositive people csir survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.