'पत्नी अन् मुलीचा मृत्यू झाला, मुलाला गर्दीतून खेचून बाहेर काढले', पीडित व्यक्तीला अश्रू अनावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:36 IST2025-02-16T14:35:48+5:302025-02-16T14:36:03+5:30
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेगराचेंगरीत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे.

'पत्नी अन् मुलीचा मृत्यू झाला, मुलाला गर्दीतून खेचून बाहेर काढले', पीडित व्यक्तीला अश्रू अनावर...
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांसह अनेक महिलांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू झालेल्यांमध्ये बिहारमधील 9, दिल्लीतील 8 आणि हरियाणातील एका महिलेचा समावेश आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांचे आक्रोश पाहायला मिलत आहे. दरम्यान, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत.
माजी बायको-मुलगी गेली...
राजकुमार मांझी नावाच्या एका व्यक्तीने मीडियाशी बोलताना सांगितले की, तो बिहारमधील नवादा येथील त्याच्या घरी जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचला होता. तो आफल्या पत्नी, मुलगी आणि मुलासोबत स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असताना अचानक गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला, तर मुलाला कसेबसे गर्दीतून खेचून बाहेर काढले. या घटनेनंतर राजकुमार यांची जगण्याची इच्छा नाही, पण मुलासाठी जगणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कुंभमेळा असो वा नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, सामान्य माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जबाबदारी घेणार की नाही? असा सवालही त्यांनी केला.
मांझी कुटुंब भट्टीवर काम करायचे
पटवा सराई गावात राहणारे राजकुमार मांझी पत्नी शांती देवी, मुलगी पूजा कुमारी आणि मुलासह हरियाणातील एका वीटभट्टीवर काम करायचे. ते दिल्लीहून नवादाला जाणारी ट्रेन पकडण्याच्या तयारीत असताना अचानक स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली, ज्यात आई आणि मुलीला आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर वाटप आणि जॉब कार्डवर नावे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आपले नाव जोडण्यासाठी राजकुमार मांझी हे कुटुंबासह घरी परतत होते. मात्र चेंगराचेंगरीत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.