संघ निष्ठावंत मनोज सिन्हा बनले जम्मू आणि काश्मीरचे नवे नायब राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:33 AM2020-08-07T01:33:46+5:302020-08-07T01:35:07+5:30
पहिल्यांदच संघ निष्ठावंत राजभवनमध्ये
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला हाताळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत निवडलेले मनोज सिन्हा हे चौथे ठरले आहेत. सिन्हा यांची नायब राज्यपाल पदावरील निवड महत्त्वाची आहे की ते राजभवनमध्ये विराजमान होणारे पहिलेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर निष्ठावंत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ११ जण तेथील राजभवनमध्ये गेले परंतु कोणीही संघ परिवाराशी संबंधित नव्हता. यापूर्वी मोदी यांनी एन. एन. व्होरा, सत्यपाल मलिक आणि जी. सी. मुरमू यांना तेथील दिलेल्या जबाबदारीचा प्रयोग फसला तेव्हा त्यांनी सिन्हा यांना चार आॅगस्ट रोजी सायंकाळी आपल्या सात लोक कल्याण मार्ग निवासस्थानी बोलावून घेतले.
सिन्हा यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला तेव्हा आपल्याला का बोलावले याची काहीच कल्पना नव्हती. मोदी यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघ सिन्हा हेच हाताळतात. सिन्हा तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले होते. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुनर्बांधणी होत असून सिन्हा यांना त्यात महत्वाची जबाबदारी मिळणार होती आणि येत्या नोव्हेंबरमध्ये राज्यसभेसाठीच्या निवडणुकीत जागाही मिळणार
होती.
सिन्हा यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये जबाबदारी असेल ती योग्य वेळेत लोकशाही प्रक्रिया पुन:स्थापन करणे आणि हिंसाचाराने त्रासलेल्या राज्यात शांतता स्थापन करण्याची. सिन्हा यांच्या पूर्वसुरींना ज्या गोष्टींत अपयश आले ते काम पूर्ण करून दाखवावे लागेल.
आश्चर्यचकित झालो
च्सिन्हा ‘लोकमत’ शी सकाळी बोलताना म्हणाले की, अयोध्येत राममंदिरासाठी भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी आलेल्या फोनमुळे मी आश्चर्य चकित झालो.
च्मनोज सिन्हा यांच्या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यांची पक्ष आणि नेतृत्वाबद्दलची निष्ठा आणि दिलेले लक्ष्य पूर्ण करण्याची क्षमता. सिन्हा यांनी वाराणसीतील बीएचयूतील आयटीतून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये बी. टेक केले.