भारतात आर्थिक विकास, औद्योगिकीकरणाचे नवे युग

By admin | Published: November 13, 2014 02:08 AM2014-11-13T02:08:59+5:302014-11-13T02:08:59+5:30

भारतात आर्थिक विकास व औद्योगिकीकरणाचे नवे युग सुरू झाले असून भारत व असियान देश परस्परांचे चांगले सहकारी बनू शकतात, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असियान संघटनेतील नेत्यांना सांगितले.

New era of economic development, industrialization in India | भारतात आर्थिक विकास, औद्योगिकीकरणाचे नवे युग

भारतात आर्थिक विकास, औद्योगिकीकरणाचे नवे युग

Next
नरेंद्र मोदी असियानमध्ये : आशियाई देशातील चांगले संबंध, मैत्रीतून परस्पर समृद्धी निर्माण होऊ शकते  
ने पी ताव : भारतात आर्थिक विकास व औद्योगिकीकरणाचे नवे युग सुरू झाले असून भारत व असियान देश परस्परांचे चांगले सहकारी बनू शकतात, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असियान संघटनेतील नेत्यांना सांगितले. मोदी 12 व्या असियान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 
 भारत व असियान देश यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात, भारतीय अर्थव्यवस्था व या अर्थव्यवस्था यांच्यात चांगले संतुलन निर्माण होऊ शकते, असे मोदी म्हणाले. या सहकार्यामुळे आशियात संतुलन, शांतता व स्थैर्य निर्माण होऊ शकते. आशियाई देश हे भारताचे शेजारी आहेत, आपल्यातील मैत्रीतून परस्पर समृद्धी निर्माण होऊ शकते. ही नव्या युगातील मैत्री ठरू ,शकते असे मोदी म्हणाले. 
भारताचे लुक ईस्ट धोरण हे अॅक्ट ईस्ट धोरण आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
मलेशियन कंपन्यांना निमंत्रण 
 मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांची भेट घेतली. भारताने मेक इन इंडिया ही नवी मोहीम सुरू केली असून, मलेशियात स्वस्त व चांगल्या घरांची योजना राबविण्यात आली आहे, 2क्22 र्पयत भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर असावे अशी सरकारची इच्छा असून, मलेशियन कंपन्या या क्षेत्रत काम करू शकतात असे मोदी म्हणाले.  
व्यावसायिकांना भेटणार 
मोदी पुढच्या आठवडय़ात मेलबर्न येथील गोलमेज परिषदेत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख व्यावसायिक  व उद्योजकांना भेटणार आहेत. बीएचपी बिलिटन कंपनीचे सीईओ अँड्रय़ू मॅकेंझी व ऑस्ट्रेलियातील एचएसबीसी बँकेचे सीईओ टोनी क्रिप्स यांचा समावेश या उद्योजकांत आहे. मोदी ब्रिस्बेन येथे जी -2क् परिषदेला उपस्थित राहतील, त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथील गव्हर्नमेंट हाऊसमध्ये ही बैठक आहे.   (वृत्तसंस्था)
 
भारत हे माङो दुसरे घर आहे - सु की
4ने पाई ताव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोबेल पुरस्कार विजेत्या व म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या आँग सान सु की यांची भेट घेतली. त्यावेळी सु की यांनी भारत हे माङो दुसरे घर असल्याचे सांगून भारतातील आठवणींना उजाळा दिला. 
4लोकशाहीसाठी लढणा:या सु की (69) यांची मोदी यांनी प्रथमच भेट घेतली. सु की या लोकशाहीचे प्रतीक असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. म्यानमारमध्ये लोकशाही स्थापन व्हावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले याचा उल्लेख मोदी यांनी केला. 
 
 
ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यात मुक्त व्यापार करार होणो अत्यंत महत्त्वाचे - अॅबॉट
4मेलबर्न : भारताबरोबर सहकार्याने काम करण्यासाठी योग्य वेळ असून, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षभरात जर मुक्त व्यापार करार झाला तर ते परिणामकारक ठरेल, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी म्हटले आहे. 
 
4आता आम्ही चीनशी मुक्त व्यापार करार करण्याच्या तयारीत आहोत. 2क्क्5 पासून चीनशी मुक्त व्यापार करण्याची आमची तयारी चालू होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग जी-2क् परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला येत असून, त्या दरम्यान त्यांच्याशी हा करार होईल. हा करार झाला की आमचे सर्व लक्ष भारताकडे राहील. वर्षभरात जर भारताशी मुक्त व्यापार करार झाला, तर ते मोठे यश ठरेल असे अॅबॉट म्हणाले. ते द ऑस्ट्रेलियन या स्थानिक वृत्तपत्रला मुलाखत देताना बोलत होते. 
 
4भारताचे नवे पंतप्रधान अत्यंत उत्साही आहेत. दोन महिन्यांपूर्वी मी भारतात गेलो होतो, तेव्हा त्यांनी हा करार करण्याची इच्छा दाखवली होती, असे अॅबॉट म्हणाले.

 

Web Title: New era of economic development, industrialization in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.