रोज नवा अंदाज! मान्सून उशिरा, पण चांगला येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 06:47 AM2023-05-27T06:47:46+5:302023-05-27T06:47:59+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनो या घटकाचा प्रभाव यंदा राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र, भारतीय हवामान शास्त्र विभागाने शुक्रवारी दिलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, या घटकासह हिंद महासागर द्विधृव (इंडियन ओशन डायपोल) हा घटकही प्रभावी आहे. परिणामी, मान्सून यंदा ९६ ते १०४ टक्के अर्थात, सरासरी इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जूनमध्ये मध्य भारतात विशेष करून, महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. एल निनोच्या वर्षात पाऊस कमी होतोच, असे नाही.
सध्या कुठे आहे मान्सून?
n सध्या मान्सून हा अंदमान सागरात, तसेच बंगालच्या उपसागराकडे प्रगती करत आहे. हा प्रवाह सध्या हळूहळू सक्षम होत आहे. दीर्घकालीन अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख ४ जून अशी अपेक्षित ठेवली आहे.
n यात किमान चार दिवसांचा कालावधी मागे- पुढे होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाचे डॉ. डी.एस. पै यांनी व्यक्त केली.